जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल पण तुम्हाला भांडवलाची अडचण असेल तर PMEGP (PMEGP Loan Yojana) या योजनेची तुम्हाला खूप मदत होऊ शकते. या योजनेअंतर्गत तुम्हाला 50 लाखांपर्यंतच कर्ज मिळू शकत. या योजेनेसाठी अर्ज कसा सादर करायचा, यासाठी पात्रता काय आहे? या गोष्टींबाबत आपण या लेखामधून माहिती घेणार आहोत.
PMEGP रोजगार योजना – 2023
PMEGP चा Full फॉर्म Prime Minister’s Employment Generation Programme आहे. मराठीत याचा अर्थ प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना असा होतो. या योजनेअंतर्गत लाभार्थीना सरकारकडून एकूण प्रोजेक्ट कॉस्टच्या 15% ते 35% पर्यंत सबसिडी मिळते. या योजनेची अंमलबजावणी Khadi and Village Industries Commission (KVIC) द्वारे केली जाते. जर कोणी PMEGP Yojana 2023 या योजने अंतर्गत लोन घेत असेल तर त्यांना सबसिडी सुद्धा मिळते.
PMEGP Loan Yojana या योजनेअंतर्गत मॅन्युफॅक्चरिंग प्रोजेक्टसाठी 50 लाखांपर्यंत तसेच सर्विस क्षेत्रातील व्यवसायासाठी 20 लाखांपर्यंत लोन मिळत. 1 जून 2022 पासून सरकारने या योजनेतून मिळणाऱ्या लोनची लिमिट वाढवली आहे.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेबाबत संपूर्ण माहिती.
PMEGP योजना Highlights
योजनेच नाव | प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना |
मिळणारे कर्ज | 50 लाखांपर्यंत |
अर्ज कसा करावा | ऑनलाइन |
वेबसाइट | https://www.kviconline.gov.in/ |
15% पासून 35% पर्यंत सबसिडी
PMEGP Loan Yojana या योजनेअंतर्गत सरकार कडून 15% ते 35% सबसिडी मिळते. तुमच्या श्रेणीनुसार तुम्हाला सबसिडी मिळते.
General कॅटेगरी मधील लाभार्थी
ग्रामीण क्षेत्रातील अर्जदारांसाठी : 25%
शहरी क्षेत्रातील अर्जदारांसाठी : 15%
Special कॅटेगरी मधील लाभार्थी ( महिला, SC, ST, OBC अल्पसंख्यांक, अपंग इत्यादी )
ग्रामीण क्षेत्रातील अर्जदारांसाठी : 35%
शहरी क्षेत्रातील अर्जदारांसाठी : 25%
PMEGP Loan Yojana – कुठे मिळेल लोन
- सर्व सरकारी बँका (SBI, BOB, UNION BNAK)
- सर्व ग्रामीण बँका
- सहकारी बँका
- प्रायव्हेट बँका
- सिडबी
या योजनेसाठी व्याजदर
हे लोन इतर बिझनेस लोनसारखेच असेल पण यात तुम्हाला सरकार कडून सबसिडी मिळाल्यामुळे एकूण लोन कमी होईल. या योजनेसाठी व्याजदर हा बँकांच्या नियमांप्रमाणे असेल. साधारण 11 ते 12% पासून व्याजदर सुरू होतात.
कोणत्या उद्योगांना मिळेल फायदा
- वन उत्पादनांवर आधारित उद्योग
- टेक्सटाइल उद्योग
- खाद्य उद्योग
- कृषी आधारित उद्योग
- रसायन उद्योग
- सेवा क्षेत्रातील व्यवसाय
हे सुद्धा वाचा : अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करावा | Agarbatti making business | मशीनची किंमत, साहित्य, कच्चा माल
PMEGP Loan Yojana पात्रता
- अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे
- प्रत्येक कुटुंबातून फक्त एक जन या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
- मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायासाठी 10 लाखांपेक्षा जास्त तसेच सर्विस क्षेत्रातील व्यवसायासाठी 5 लाखांपेक्षा जास्त कर्ज कर्ज हव असेल तर अर्जदार 8 वी पास असण अनिवार्य आहे.
- फक्त नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेचा लाभ होऊ शकतो.
- NGOs, Charitable Trusts आणि स्वयं सहाय्यता बचत गटांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळू शकतो.
- जर अर्जदाराने इतर कोणत्या सबसिडी योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येऊ शकत नाही.
PMEGP Loan Scheme साठी लागणारी कागदपत्रे
- Application फॉर्म आणि पासपोर्ट साईज फोटो
- ओळखपत्र आणि Address प्रूफ
- पॅनकार्ड , आधार कार्ड
- स्पेशल कॅटेगरी असल्यास त्याचा पुरावा
- प्रोजेक्ट रीपोर्ट
- शैक्षणिक पुरावे आणि प्रमाणपत्र
- उद्योजक विकास कार्यक्रम (EDP) ट्रेनिंग सर्टिफिकेट
- SC/ST/OBC/अल्पसंख्यांक इत्यादी साठी प्रमाणपत्र
PMEGP योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा ( PMEGP Loan Apply)
STEP 1 : https://www.kviconline.gov.in/ या वेबसाइटला भेट द्या.
STEP 2 : दिलेल्या सूचनांप्रमाणे फॉर्म पूर्ण भरा. त्यात आवश्यक ती माहिती टाका.
STEP 3 : फॉर्म भरून झाल्यावर Save Applicant Data वर क्लिक करा.
STEP 4 : Data सेव्ह केल्यावर आता सगळे कागदपत्र अपलोड करा.
STEP 5 : अर्ज पूर्ण होऊन सबमीट केल्यावर अर्जदाराचा Id आणि पासवर्ड त्याच्या मोबाइल क्रमांकावर येईल.
PMEGP योजनेसाठी ऑफलाइन अर्ज कसा करावा
जर तुम्हाला या योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करायचा असेल तर Application Form भरा.
मग गरजेच्या कागदपत्रांसोबत बँकेत फॉर्म सादर करा.
PMEGP योजनेसाठी पात्रता
अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष असावे. तसेच इतर योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
PMEGP योजनेअंतर्गत जास्तीत जास्त किती लोन मिळत?
PMEGP योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 50 लाखांपर्यंत कर्ज मिळत.
PMEGP योजनेसाठी अर्ज कुठून करावा ?
PMEGP योजनेसाठी https://www.kviconline.gov.in/pmegpeportal/jsp/pmegponline.jsp या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज दाखल करू शकता.
PMEGP योजनेअंतर्गत किती सबसिडी मिळते ?
PMEGP योजनेअंतर्गत 15% ते 35% सबसिडी मिळते.
( नोट: सदर माहितीत काही त्रुटी किंवा बदल असू शकतात. वाचकांनी त्याची खात्री करावी. तसेच तुमच्या काही सूचना असल्यास नक्की सांगा. )