देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज (Mudra Loan Yojana) योजना सुरू केली होती. पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनामध्ये (Mudra Yojana Loan in Marathi) जी कोणी व्यक्ती स्वतः चा व्यवसाय / उद्योग / स्टार्टअप सुरु करू इच्छिते त्यांना रुपये 1000000 /- पर्यंत ची आर्थिक मदत कर्ज रूपाने दिली जाते. स्वत:चा लघु उद्योग / व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा त्याला मोठा करायचा असेल तर मुद्रा योजने चा अर्ज करून तुम्ही रुपये 1000000 /- पर्यंतचे कर्ज सहजपने मिळवू शकता. या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की अर्ज कसा करावा (Mudra loan application) . त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोण कोणती लागतील, अटी आणि पात्रता काय आहे , आणि इतर माहिती, योजनेशी संबंधित सर्व माहिती मिळविण्यासाठी,आपण हा लेख शेवटपर्यंत वाचावा .
प्रधानमंत्री मुद्रा योजना २०२३ | Pradhan Mantri Mudra Loan Yojana 2023
प्रधानमंत्री मुद्रा योजना केंद्र सरकार चालवते आणि या योजने साठी 3 लाख कोटी रुपयांचा बजेट तयार सुद्धा केला आहे. आतापर्यंत 1.75 लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. हे काही इच्छुक उमेदवार आहे ज्यांना मुद्रा योजना 2023 अंतर्गत कर्ज घ्यायचे आहे , त्यांना सांगू इच्छितो कि कर्ज घेण्यासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही. कर्ज परतफेडीचा कालावधी ५ वर्षांनी वाढवण्यात आला असून या प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजने अंतर्गत कर्ज घेण्यासाठी मुद्रा कार्ड दिले जाते .
प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे प्रकार | Types of Pradhan Mantri Mudra Loan Yojana
या योजनेंतर्गत तीन प्रकारची कर्जे दिली जातात.
- शिशू कर्ज: ₹ 50000 पर्यंतचे कर्ज वाटप केले जाते.
- किशोर कर्ज: ₹ 50000 ते ₹ 500000 पर्यंतचे कर्ज वाटप केले जाते.
- तरुण कर्ज: ₹ 500000 ते ₹ 1000000 पर्यंतचे कर्ज वाटप केले जाते.
या लेखात आपण तरुण कर्ज (तरुण ऋण) बद्दल जाणून घेणार आहोत.
आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात एकूण ३६३८८ लाभार्थ्यांची या योजने चा लाभ घेतला असून त्यामध्ये मंजूर रक्कम २९४०.७१ कोटी आहे तर वितरित केलेली रक्कम २६८९.५६ कोटी आहे.
हे सुद्धा वाचा : Small business ideas in Pune | पुण्यात सुरू करता येणारे व्यवसाय
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेचे फायदे | Benefits of Pradhan Mantri Mudra Karj Yojana in Marathi
- भारत देशातील कोणतीही व्यक्ती जी स्वतःचा लघु उद्योग / व्यवसाय / स्टार्टअप सुरू करायचा असेल ते प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना मधून कर्ज घेऊन त्याचा उद्योग सुरु करू शकतात.
- योजनेचा लाभार्थीला मुद्रा कार्ड मिळते, त्याच्या मदतीने तो त्याच्या व्यवसायाच्या गरजा पूर्ण करू शकतो.
- प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत शातील नागरिकांना त्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही हमीशिवाय कर्ज दिले जाते . आणि कर्जासाठी करण्यात येणाऱ्या प्रक्रियासाठी कोणताही चार्जही/ फीस घेतला जात नाही.प्रधानमंत्री मुद्रा योजनेत कर्ज परतफेडीचा कालावधी ५ वर्षांपर्यंत वाढवता येतो.
- परवडणाऱ्या व्याजदरात छोट्या रकमेसाठी व्यवसाय कर्ज मिळू शकते.
- या योजनेतून घेतलेले पैसे फक्त व्यवसायासाठी वापरता येतील.
मुद्रा योजनेत समाविष्ट बँका | Banks eligible for PM Mudra Loan Yojana
- कॅनरा बँक
- फेडरल बँक
- इंडियन बँक
- कोटक महिंद्रा बँक
- सारस्वत बँक
- युको बँक
- बँक ऑफ बडोदा
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया
- एचडीएफसी बँक
- इंडियन ओव्हरसीज बँक
- ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
- स्टेट बँक ऑफ इंडिया
- युनियन बँक ऑफ इंडिया
- बँक ऑफ इंडिया
- कॉर्पोरेशन बँक
- आयसीआयसीआय बँक
- सिंडिकेट बँक
- युनियन बँक ऑफ इंडिया
- बँक ऑफ महाराष्ट्र
- देना बँक
- IDBI बँक
- अक्सिस बँक
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना योजनेचे उद्दिष्ट काय आहे ? | What is the objective of Pradhan Mantri Mudra Karj Yojana Yojana?
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेचे उद्दिष्ट असे आहे कि , देशात असे अनेक लोक आहेत ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु ते आर्थिक अडचणींना सामोरे जाउन पैशाअभावी ते व्यवसाय सुरू करू शकत नाहीत, म्हणून अशा लोकांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना ही योजना सुरू केली आहे. 2023 अंतर्गत मुद्रा कर्ज घेऊन तुम्ही स्वत:चा लघु उद्योग / व्यवसाय सुरु करू शकता . आणि या योजनेअंतर्गत लोकांना अगदी सोप्यासरळ पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देणे. प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना 2023 द्वारे देशातील तरुणांची स्वप्ने साकार करणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा या योजनेचा मूळ हेतू आहे .
हे सुद्धा वाचा : पेपर कप व्यवसाय कसा सुरू करावा | Paper Cup Manufacturing Business In Marathi
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना पात्रता
भारतीय नागरिक ज्यांच्याकडे सेवा क्षेत्रातील क्रियाकलाप किंवा व्यापार किंवा उत्पादन क्रियाकलापांसाठी स्वतःचा व्यवसाय योजना आहे आणि त्यांना 10 लाख रुपयांपर्यंत कर्जाची आवश्यकता आहे ते मुद्रा कर्जासाठी अर्ज करू शकतात. मुद्रा कर्ज खालील ठिकाणांहून मिळू शकते:
- लहान वित्त बँक
- मायक्रो फायनान्स संस्था
- NBFCs (नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या)
- सरकारी बँक
- खाजगी बँक
- प्रादेशिक ग्रामीण बँक
मुद्रा कर्ज कोणासाठी आणि कोणत्या उद्देशांसाठी मिळू शकते ?
- समुदाय , वैयक्तिक सेवा आणि सामाजिक कार्य म्हणजे दुकान, बुटीक, सलून, जिम, ड्राय क्लीनिंग, ब्युटी पार्लर, टेलरिंग शॉप, कुरिअर सेवा, फोटोकॉपी आणि डीटीपी केंद्रांशी संबंधित क्रियाकलाप किंवा व्यवसायासाठी मिळू शकते.
- वाहतूक वाहन या साठी कर्ज उदा : तीनचाकी, प्रवासी कार, ई-रिक्षा, ऑटो रिक्षा, टॅक्सी यांसारखी वैयक्तिक वाहतूक वाहने खरेदी करण्यासाठीहि तुम्हाला कर्ज मिळू शकते.
- अन्न उत्पादने क्षेत्र या साठी कर्ज उदा : आईस्क्रीम बनवणे, लोणचे बनवणे, पापड बनवणे, कोल्ड चेन वाहने, जेली किंवा जॅम बनवणे, केटरिंग, गोड पास्ता आणि ब्रेड बनवणे यासारख्या उपक्रमांसाठी मुद्रा कर्ज मिळू शकते.
- दुकानदार आणि व्यापाऱ्यांसाठी व्यवसाय कर्ज उदा : ज्या लोकांना स्वतःचे दुकान, व्यापार आणि व्यवसाय चालवण्यासाठी पैशांची गरज आहे आणि उत्पन्न मिळवण्यासाठी बिगर शेती उपक्रम राबविण्यासाठी पैसे लागतात ते मुद्रा कर्ज योजने अंतगर्त कर्ज घेऊ शकतात.
- कापड उत्पादने क्षेत्र उदा : खादी ,पारंपारिक छपाई आणि डाईंग,पॉवरलूम, हातमाग, चिकन/जरदोजी वर्क, संगणकीकृत भरतकाम, फॅब्रिकवरील डिझाईन, उत्पादनांसाठी इतर टेक्सटाईल क्रियाकलापांसाठी मुद्रा कर्ज देखील मिळू शकते.
- खेती और उससे संबंधित कार्य उदा :शेतकरी बांधव सुद्धा या योजने चा लाभ घेऊ शकतात मत्स्यपालन, गुरेढोरे, छाटणी, कृषी चिकित्सालय, मधमाशी पालन, यासारख्या कामांसाठी मुद्रा कर्ज घेता येते.
मुद्रा कर्ज योजनेसाठी महत्वाची कागदपत्रे | Important Documents for Mudra Loan Scheme
लघुद्योग सुरु करण्यासाठी किंवा तो वाढवण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना ( Nudra loan Scheme ) 2023 अंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकतात.
- वय किमान १८ वर्ष असावे .
- आधार कार्ड
- अर्जदार कोणत्याही बँकेत डिफॉल्टर नसावा
- पॅन कार्ड
- अर्जदराचा कायमचा पत्ता
- व्यवसाय पत्ता आणि स्थापनेचा पुरावा
- मागील तीन वर्षांची Balance Sheet
- इन्कम टॅक्स रिटर्न आणि सेल्फ टॅक्स रिटर्न
- पासपोर्ट आकाराचा फोटो
प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कशा करावा ? अर्ज करण्याची प्रक्रिया | How to apply online for Pradhan Mantri Mudra Yojana? Application Process In Marathi
- दिलेल्या वेबसाईट वर जा click here
- आता प्रधानमंत्री मुद्रा योजनेची वेबसाईट ओपन होईल.
- मुख्यपृष्ठावर तुम्हाला मुद्रा योजनेचे तीन प्रकार दिसतील जे खालीलप्रमाणे आहेत.
शिशु
किशोर
तरुण या ऑप्शन वर क्लिक करा. - यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
- तुम्हाला आता अर्ज डाउनलोड करावा लागेल.
- त्यानंतर त्या अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्यावी.
- आता तुम्हाला अर्जात विचारलेली सर्व महत्त्वाची माहिती काळजीपूर्वक भरावी .
- यानंतर तुम्हाला सर्व महत्त्वाची कागदपत्रे जोडावी.
- आता तुम्हाला हा अर्ज तुमच्या जवळच्या बँकेत जमा करावा लागेल.
- तुमच्या अर्जाच्या पडताळणीनंतर मान्य झालेले असाल तर 1 महिन्याच्या आत तुम्हाला कर्ज वितरित केले जाईल.
पीएम मुद्रा योजनेत ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा ? | How to apply offline in PM Mudra Loan Yojana?
या योजने साठी इच्छुक उमेदवार त्यांच्या जवळच्या सरकारी बँक, खाजगी बँक, ग्रामीण बँक आणि व्यापारी बँक इत्यादींमध्ये जाऊन त्यांच्या सर्व कागदपत्रांसह अर्ज करू शकतात.
- यानंतर, ज्या बँकेतून तुम्हाला कर्ज घ्यायचे आहे तेथे जा आणि अर्ज भरा.
- आणि फॉर्म भरल्यानंतर तुमच्या सर्व कागदपत्र त्याला जॉईन करा आणि बँक अधिकाऱ्या जवळ देऊन टाका.
- मग तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर, बँकेकडून तुम्हाला 1 महिन्याच्या आत कर्ज दिले जाईल.
मुद्रा पोर्टलवर लॉग इन करण्याची प्रक्रिया | Procedure to login to Mudra Portal
- दिलेल्या लिंक वर क्लिक करून मुद्रा योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल .
- आता तुमच्या समोर मुद्रा योजनेची वेबसाईट चे होम पेज ओपन होईल.
- येथले तुम्हाला लॉगिन बटण दिसेल त्यावर क्लिक करा.
- आता तुमच्या समोर काही रकाने येतील तिथे तुमचा युजरनेम, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकावा आणि लॉगिन बटण त्यावर क्लिक करावे .
- अशा प्रकारे अगदी सहज पणे तुम्ही मुद्रा पोर्टलवर लॉग इन करू शकतात .
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना हेल्पलाइन क्रमांक | Pradhan Mantri Mudra Karj Yojana Helpline Number
महाराष्ट्र साठी 18001022636 हेल्पलाइन क्रमांक आहे तरी जास्त माहिती किंवा तुमची तक्रार नोंदविण्यासाठी या क्रमांकाचा वापर करावा
Comments 3