Small business ideas in Pune- मागच्या काही वर्षांमध्ये पुण्याचा झपाट्याने विकास झाला आहे. त्यामुळे पुण्यात व्यवसायाच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. लोकांच बदलणारं राहणीमान, वाढणारी इन्कम, इंडस्ट्रीजच वाढणार जाळ, या काही गोष्टी पुण्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करतात.
तुम्हाला Pune शहरात व्यवसाय सुरू करायचा आहे, पण तुमच्याकडे आयडिया नाहीत का? मग काळजी करू नका. कारण आम्ही तुमच्यासाठी खास पुणे शहराचा विचार करून अशा 10 बिझनेस आयडिया आणल्या आहेत, ज्यातून तुम्हाला भरपूर रिटर्न्स मिळू शकतात.
ही आहे पुणे शहरात सुरू करता येणाऱ्या टॉप व्यवसायांची यादी:
1. Car Washing – कार वॉशिंग
Pune हे देशातील एक प्रमुख ऑटोमोबाईल हब आहे. Bajaj, Tata, Mahindra सारख्या कंपनी पुण्यात आहेत. पुण्याला ‘Motor City ‘ म्हणून सुद्धा ओळखल जातं. त्यामुळे पुण्यात कार डेन्सिटि सुद्धा जास्त आहे. प्रत्येक कारचा मालक आपली कार धुण्यासाठी वॉशिंग सेंटर शोधत असतो. अशावेळी जर तुम्ही स्वतः जाऊन कार धुऊन दिली तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात काम मिळतील. सुरुवातीला एकट्याने सुरुवात करून मग Employee hire करू शकता.
2. Snacks Center – स्नॅक्स सेंटर
पुणे हा देशातील टॉप IT हबपैकी एक आहे. जगभरातील कंपन्यांची ऑफिसेस पुण्यात आहेत. तसेच अनेक मोठी विद्यापीठे पुण्यात आहेत. स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा संपूर्ण राज्यातून विद्यार्थी पुण्यात येतात. या सर्वांना झटपट आणि स्वस्त मिळेल असा नाश्ता हवा असतो. तुम्ही अगदी कमी भांडवलात हा व्यवसाय सुरू करू शकता. वडापाव सेंटर, इडली डोसा, सँडविच कॉर्नर हे काही व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता.
3. Gym – जिम
पुण्यासारख्या मेट्रो शहरात जीम किंवा फिटनेस सेंटर सुरू करणं खूप फायद्याच ठरू शकत. आता प्रत्येकजण आपल्या आरोग्याबाबत जागरूक झाला आहे. अनेक जण, जिम फिटनेस सेंटर्स जॉइन करत आहेत. आणि हा आकडा पुढे वाढतच जाणार आहे.
फक्त या व्यवसायासाठी सुरुवातीला तुम्हाला मोठी गुंतवणूक करावी लागेल. तसेच केलेली गुंतवणूक परत मिळवायला आणि व्यवसाय प्रॉफिटेबल व्हायला एक ते दोन वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त काल लागू शकतो. जिम सुरू केली तर त्यासाठी सोशल मिडियाचा वापार करायला विसरू नका. तिथून तुम्हाला मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळू शकतात.
4. योगा सेंटर
आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक जण फिट राहण्यासाठी, मन संतुलित ठेवण्यासाठी योगा चा आधार घेत आहेत. पुण्यात YOGA सेंटर सुरू करणं एक फायद्याचा बिझनेस ठरू शकतो. आधीपासूनच अनेक जण या व्यवसायातून चांगला नफा मिळवत आहेत.
योगा सेंटर सुरू करण्यासाठी आधी तुम्हाला YOGA बद्दल पूर्ण माहिती घ्यावी लागेल, YOGA सर्टिफिकेशन मिळवावे लागतील. त्यानंतर तुम्ही योगा क्लासेस सूरू करु शकता. अनेकांना योगाच महत्त्व समाजात आहे. त्यामुळे योगा चे फायदे पाहून लोकांचा योगा करण्याकडे कल वाढत आहे.
5. Cleaning Service – क्लीनिंग सर्व्हिस (Small business ideas in Pune)
कोणत्याही मेट्रो शहरात क्लीनिंग सर्व्हिसला डिमांड असते. Pune सुध्दा याला अपवाद नाही. आता यामध्ये सुध्दा दोन प्रकार पडतात. एक म्हणजे Domestic Cleaning आणि दुसरं Industrial Cleaning. Aata तुम्हाला कोणत्या प्रकारची सेवा द्यायची आहे ते पाहा. सर्वांत कॉमन सेवा म्हणजे कार क्लीनिंग सर्व्हिस, होम क्लीनिंग सर्व्हिस या आहेत.
तुम्ही कोणत्या प्रकारची सर्व्हिस देताय त्यानुसार तुम्हाला ट्रेनिंग घेण्याची आवशयकता लागू शकते. तसेच क्लीनिंग Equipments, जर Staff hire केला तर त्यांचा खर्च, इन्शुरन्स इत्यादी खर्च हा व्यवसाय सुरू करायला लागू शकतो.
Indiamart या साइटवर तुम्हाला मशीन्स मिळतील.
6. कॉफी शॉप
पुण्यात तुम्ही हा एक Trending व्यवसाय तुम्ही काही लाखांच्या गुंतवणुकीमध्ये सूरू करु शकता. पण यासाठी तुमच्याकडे मोक्याची जागा लागेल. एखाद्या आयटी पार्कच्या बाहेर किंवा कॉलेजच्या आजूबाजूला जर तुम्हाला जागा भेटली तर ती कॅफे साठी बेस्ट लोकेशन राहील.
अर्थात यासाठी तुम्हाला खर्च सुध्दा चांगलाच करावा लागेल. स्टाफ, इंव्हेंटरी यासाठी तुम्हाला खर्च करावा लागेल. तसेच कॅफे चे इंटेरियर आकर्षक करावा लागेल. Cafe साठी ambience हा एक खूप महत्त्वाचा घटक असतो.
हे सुद्धा वाचा : अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करावा | Agarbatti making business | मशीनची किंमत, साहित्य, कच्चा माल
7. कपड्यांचे दुकान
Apparel Industry पुण्यात झपाट्याने विस्तारत आहे. तुम्हाला अनेक मोठमोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडचे शोरुम पाहायला मिळतात. त्याचबरोबर स्थानिक व्यावसायिकांनी सुध्दा कपड्यांच्या मार्केटमध्ये आपला जम बसवला आहे. अजूनही या व्यवसायाला खूप वाव वाटतो आहे.
कपड्यांचं शोरुम सूरू करण्यासाठी तुम्हाला थोडी जास्त गुंतवणुक करावी लागेल. स्टोअर, इंव्हेंटरी, स्टाफ यासाठी तुम्हाला 5 ते 10 लाखांची गुंतवणूक लागू शकते. ( तुमच्या दुकानाच्या साइज आणि टाईपनुसार गुंतवणूक कमीजास्त होईल.
जाहिरातीसाठी सोशल मीडियाचा वापर करु शकता. तुम्ही तुमच्या बजेटनुसार एखाद्या ब्रँडची फ्रांचायजी सुध्दा घेऊ शकता.
8. Cloud Kitchen – क्लाउड किचन
अनेक जणांना स्वतःचा रेस्टोरंट , हॉटेल सुरू करायचा असतो पण भांडवल कमी पडत. अशांसाठी क्लाउड किचन ही एक भन्नाट कल्पना आहे. पुण्यामध्ये ऑनलाइन फूड डिलीव्हरीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. आणि येत्या काळात यामध्ये आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. क्लाउड किचनमध्ये तुम्हाला जागेची अडचण येणार नाही. तुम्ही अगदी तुमच्या घरातून सुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकता. सामान्यतः क्लाउड किचन म्हणजे फक्त एक किचन असते जिथे पदार्थ बनवून ते पार्सल काले जातात. त्यामुळे तुम्हाला मोठी आणि मोकयकी जागा, वेटर, सजावट यांसारख्या गोष्टी लागत नाही.
या व्यवसायासाठी तुम्हाला पूर्णपणे ऑनलाइन मध्यामावर अवलंबून राहावे लागेल. Swiggy, Zomatoच्या माध्यमातून तुम्ही पदार्थ deliver करू शकता. या व्यवसायासाठी तुम्हाला मार्केटिंगवर विशेष लक्ष द्याव लागेल. Facebook आणि Instagram चा योग्य वापर केल्यास तुम्ही 0 रुपयांत प्रभावी मार्केटिंग करू शकता. तसेच तुम्हाला पदार्थांची पॅकेजिंग, Branding यांवर सुद्धा विशेष लक्ष द्याव लागेल. कारण त्याच एका माध्यामातून तुमचा ग्राहकांशी थेट संबंध येईल.
9. Custom Gifts – कस्टम गिफ्ट्स (Small business ideas in Pune)
Custom gifts सेल करणे हा आणखी एक फायद्याचा व्यवसाय ठरू शकतो. विशेषतः पुण्यात जिथे अप्पर-मिडल क्लास ग्रुप वेगाने वाढत आहे, अशा ठिकाणी या व्यवसायाला चांगला स्कोप आहे. तसेच ऑनलाईन माध्यामातून तुम्ही देश तसेच जगभरात कोठेही तुमचे प्रॉडक्ट पाठवू शकता. ज्वेलरी, कपडे, भेटवस्तू अशा अनेक प्रकारच्या कस्टमाइज्ड वस्तु तुम्ही सेल करू शकता. प्रत्येकाच्या इंटरेस्ट आणि आवडीनुसार तुम्ही गिफ्ट्स तयार करू शकता. यामुळे या व्यवसायात जास्त मार्जिन मिळतो. मात्र या व्यवसायासाठी जाहिरात खूप महत्त्वाची आहे. जाहिरातीसाठी तुम्ही सोशल मीडिया माध्यम जसे की Instagram , Facebook यांचा वापर करू शकता.
तसेच Branding वर तुम्हाला विशेष लक्ष द्याव लागेल. या व्यवसायात तुम्ही दरवाजाच्या आकर्षक Nameplates सुद्धा सेल करू शकता. या Nameplates चा दर सुमारे 2 ते 5 हजार रुपये इतका आहे. या व्यवसयात कलेला विशेष महत्त्व आहे. जितके आकर्षक गिफ्ट्स तुम्हाला बनवता येतील, तितका जास्त फायदा तुम्हाला होईल.
10. Organic Store – ऑरगॅनिक स्टोअर
मागच्या काही काळात, विशेषतः कोरोनानंतर लोक आपल्या आरोगयाबाबत खूप जागरूक झाले आहेत. त्यामुळे ऑरगॅनिक प्रॉडक्टकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. पुण्यासारख्या शहरात ऑरगॅनिक स्टोअर सुरू केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुम्ही ऑरगॅनिक फळे, भाजीपाला आणि इतर खाद्यपदार्थ तसेच A2 मिल्क, ऑरगॅनिक सौंदर्यप्रसाधने विक्रीसाठी ठेऊ शकता.
एखादी मोठी सोसायटी किंवा हाय क्लास लोकांची वस्ती असलेल्या एरिया मध्ये अशा प्रकारच स्टोअर सुरू केल्यास त्याला उत्तम प्रतिसाद मिळू शकतो. माल घेण्यासाठी तुम्ही डायरेक्ट ऑरगॅनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत संपर्क साधू शकता.
या काही बिझनेस आयडिया आहेत ज्यांना पुण्यात चांगल यश मिळू शकत. बिझनेस आयडिया आवडल्या तर फेसबुक आणि Whatsapp वर शेअर करायला विसरू नका. अशाच अजून बिझनेस आयडिया मिळवण्यासाठी Notifications ऑन करून ठेवा.
पुण्यात सुरू करता येणारे टॉप व्यवसाय
क्लाऊड किचन, कॅफे, ऑरगॅनिक स्टोअर,क्लीनिंग सर्व्हिस
Comments 1