आपल्या देशात चहाला एक विशेष महत्त्व आहे. अनेकांची सकाळ चहाच्या घोटाने होते. काही जण तर दिवसातून 5-6 वेळ चहा पितात. आपल्याला जागोजागी चहाच्या तपऱ्या दिसतात. पण याच चहाच्या व्यवसायातून एकाने तब्बल 100 कोटींचा व्यवसाय केला. त्या तरूणाच नाव आहे अनुभव दुबे (Anubhav Dubey – Founder of Chai Sutta Bar). पण अनुभवचा हा प्रवास सोपा नव्हता. अनेक अडथळ्यांचा सामना त्याला करायला लागला. (Chai sutta bar success story)
IAS बनण्याचं स्वप्न
अनुभवचे वडील व्यावसायिक होते. पण आपल्या मुलाने व्यवसायातील टेंशन पासून दूर राहावं अस त्यांना वाटायच. म्हणूनच प्रत्येक भारतीय पालकांप्रमाणे अनुभवच्या वडिलांना सुध्दा आपला आपला मुलगा कलेक्टर व्हावा अशी वाटत होतं. त्यासाठी अनुभव कॉलेजनंतर दिल्लीला गेला. सर्वकाही ठीक चालू होतं.
एके दिवशी अनुभवला त्याचा मित्र आनंदाचा फोन आला आणि बोलता बोलता त्यांनी चहाचा बिझनेस करायचं ठरवलं, ज्याबद्दल कॉलेजमध्ये ते बोलायचे. अनुभव मग पुन्हा इंदोर ला गेला.
अशी झाली चाय सुट्टा बारची सुरुवात
आधी एखाद्या व्यवसायाची फ्रेंचाइस घ्यावी अशी त्यांची इच्छा होती. पण त्यांच्याकडे तितक भांडवल नसत. त्या दोघांकडे मिळून अडीच ते तीन लाख रुपये भांडवल होत.
यातून त्यांनी चहाच आऊटलेट सुरू करायचं ठरवलं. ते ही अशाप्रकारे की कोणतीही व्यक्ती व्यवस्थित बसून चहा पिऊ शकेल. आणि ते ही कमी किंमतीत.
आता त्यांच्या चहाच्या आऊटलेटच नाव काय ठेवायचं हा त्यांना प्रश्न पडला. थोडा विचार करून मग त्यांनी ‘चाय सुट्टा बार‘ हे नाव ठेवायचं ठरवलं. ते यासाठी की हे नाव जरा आकर्षक आहे.
हटके मार्केटिंग (Chai sutta bar success story)
आता नाव तर झालं पण त्यांच्याकडे जास्त भांडवल नव्हतं. मग कमी किंमतीत योग्य जागा मिळणं महत्त्वाचं होत. मार्केटिंग साठी जास्त पैसे खर्च करता येणार नव्हते. यावर एक उपाय शोधला. त्यांनी गर्ल्स हॉस्टेलच्या समोर आऊटलेट सुरू करायचं ठरवलं. कारण जिथे गर्ल्स हॉस्टेल असेल त्याजवळ मूले सद्धा येतील.
जास्त पैसे नव्हते म्हणून त्यांनी स्वतःच Pamplet डिझाईन करून वाटायला सुरुवात केली. जेव्हा त्यांनी आऊटलेट सुरू केला त्यावेळी पहिल्या दिवशी त्यांनी लोकांना मोफत चहा ऑफर केला. त्यांना वाटलं की फ्री असल्यामुळे खूप लोक येतील . पण त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
मग त्यांनी एक आयडिया वापरली. त्यांचे इंदोरमध्ये खुप मित्र होते. त्यांनी एक डमी क्राऊड तयार केलं. आपल्या सगळ्या मित्रांना चहा, नाश्ता करण्यासाठी बोलावलं. दुसऱ्या दिवशी त्यांचे 100-200 मित्र चाय सुट्टा बारच्या पहिल्या आऊटलेट वर आले.
नव्यानेच सुरू झालेल्या आऊटलेट ला एवढी गर्दी पाहून लोक आश्चर्यचकित झाले . लोकांना वाटलं की नक्कीच कोणतातरी मोठा ब्रँड इथे आलाय किंवा तिथे काहीतरी नवीन गोष्ट मिळत असेल. आता हे बघून अनेक जण त्यांच्या आऊटलेटला आले. मुलं यायला लागली, मुली यायला लागल्या.काही फॅमिलीज सुध्दा यायला लागल्या. आता त्यांच्या आऊटलेटला बऱ्यापैकी गर्दी जमू लागली.
Also Read : चाय सुट्टा बार फ्रेंचाइस (Cost + Profit)
आणखी हटके मार्केटिंगच्या आयडियाज
मार्केटिंगसाठी अजून एक अनोखी शक्कल त्यांनी लढवली. ती म्हणजे जेव्हा अनुभव आणि त्यांचे मित्र इंदोरमधील कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी जायचे, तेव्हा ते आपआपसात मोठ्याने चाय सुट्टा बार बदद्ल बोलत बसायचे. की तिथे खूप छान चहा मिळते. बर्गर सँडविच मिळतात. अशाप्रकारे लोकांच्या मनात त्यांनी चाय सुट्टा बार बद्दल आकर्षण निर्माण केलं.
फ्रेंचाइससाठी कॉल्स
चाय सुट्टा बारला मिळालेला चांगला प्रतिसाद पाहून अनेकांनी त्यांच्याकडे फ्रांचायजी सुध्दा मागायला सुरुवात केली. त्यांच्या पहिल्या आऊटलेटला सुध्दा खूप गर्दी होत होती. म्हणून त्यांना अजून आऊटलेट सुरू करायचे होते. त्यांनी पहिल्या सहा महिन्यांतच इंदोरमध्ये 3 आऊटलेट सुरू केले. त्यांनंतर यांना फ्रांचायजी साठी मुंबई, दिल्ली सारख्या शहरांतून सुध्दा कॉल यायला लागले.
मित्रांनो ते सुरुवातीला 7 रुपयाला चहा विकायचे. आतसुद्धा ते परवडेल अशा किंमतीत चहा विकतात. आज ते प्रत्येक दिवशी 3 लाखापेक्षा जास्त चहाचे कुल्हड विकतात. 3 लाखापेक्षा जास्त चहा ते विकतात. भारतात तसेच ओमान आणि युएई आणि या देशांमध्ये मिळून त्यांचे 180 पेक्षा जास्त आऊटलेट आहेत. (Chai sutta bar success story)
चाय सुट्टा बारच्या यशाच रहस्य (Chai sutta bar success story)
चाय सुट्टा बार मध्ये तुम्हाला चॉकलेट चहा, रोज इलायची, पान, अद्रक असे चहाचे अनेक फ्लेवर्स मिळतील. तसेच कॉफी, कोल्ड कॉफी, बन, पास्ता, बर्गर, सँडविच, मॅगी असे अनेक पदार्थ तुम्हाला इथे मिळतील. यांच्या यशाचं एक कारण म्हणजे भारतात जास्त करून टपरीवर चहा मिळते. पण काहीजणांना चांगल्या वातावरणात बसून गप्पा मारत चहा प्यायला आवडतं. हा प्रॉब्लेम त्यांनी नोटीस केला आणि यावर सोल्यूशन काढलं. हे त्यांच्या यशाचं एक मोठं कारण बनलं.
फक्त 5 वर्षात त्यांनी कोणतीही फंडिंग न घेता आज 100 कोटींचा टर्नओव्हर टच केला आहे. म्हणून मित्रांनो, व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे किती भांडवल आहे यापेक्षा तुम्ही तो वाढवण्यासाठी किती आयडिया वापरता हे जास्त महत्त्वाचं आहे.
ब्लॉग आवडला तर Whatsapp आणि Facebook वर शेअर करा. तसेच नवीन ब्लॉग्स सर्वात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटिफिकेशन ON करा.
Also Read : पेपर कप व्यवसाय कसा सुरू करावा | Paper Cup Manufacturing Business In Marathi