Doodhwala Startup Case Study : स्टार्टअप बंद पडण तस नवीन नाही. पण ही स्टार्टअप केस स्टडी जरा वेगळी आहे. आपण या केस स्टडी मधून 100 कोटींची फंडिंग मिळवलेला स्टार्टअप बंद का पडला याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. या स्टार्टअपच नाव आहे Doodhwala.
हा स्टार्टअप पेटीएम, झोमॅटोइतका प्रसिध्द नाही पण यातून तुम्हाला शिकण्यासाठी खुपकाही आहे.
आचार्य चाणक्य यांनी सांगून ठेवलं आहे की, “इतरांच्या चुकांमधून शिका, कारण सर्व चुका तुम्ही स्वतः करून पाहिल्यात तर तुम्हाला हे पूर्ण आयुष्य पुरणार नाही”.
Doodhwala स्टार्टअपबद्दल माहिती
Doodhwala हे एक बंगलोरस्थित स्टार्टअप होतं. 2015 मध्ये इब्राहीम अकबारी (Ebrahim Akbari) आणि आकाश अगरवाल (Aakash Agarwal) यांनी Doodhwala स्टार्टअपची सुरुवात केली. ते दुध विक्रेत्यांकडून आणि डेरीमधून दूध गोला करायचे आणि कस्टमर्सला सप्लाय करायचे. या स्टार्टअपने 14.2 दशलक्ष डॉलर्सची म्हणजेच जवळपास 115 कोटी रुपयांची फंडिंग मिळवली.
मित्रांनो, ते प्रत्येक दिवसाला तब्बल 30 हजार लिटर पेक्षा जास्त दुधाची डिलिव्हरी करायचे. दुधासोबतच ते फ्रुट्स, व्हेजिटेबल , फुड प्रोडक्टस सुध्दा डिलिव्हर करायचे. एक स्टार्टअप यशस्वी होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, त्या सगळ्या गोष्टी या स्टार्टअप कडे होत्या. महत्वाकांक्षी फाउंडर्स, चांगला प्रॉडक्ट, इफिशियंट सर्व्हिसेस हे सगळं काही या स्टार्टअप कडे होतं.
मग हा स्टार्टअप बंद का झाला? यांना कस्टमर्स मिळत नव्हते का? तर मित्रांनो अस मुळीच नाही. मित्रांनो हा स्टार्टअप दरवर्षी 250% ने वाढत होता. 70 पेक्षा जास्त प्रकारच्या दुधाची ते डिलिव्हरी करायचे. ते सुध्दा सकाळी 7 च्या आधी. दुधाची किंमतसुध्दा मार्केटपेक्षा कमी होती. मग नक्की हा स्टार्टअप बंद का झाला? याची 5 कारणे आपण या ब्लॉगमधुन पाहणार आहोत. (Doodhwala Startup Case Study)
Doodhwala स्टार्टअप बंद होण्याची कारणे (Doodhwala Startup Case Study)
1. कॅश बर्न :
मित्रांनो अनेक स्टार्टअप सुरुवातीला फक्त कस्टमर्स मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि ते बरोबर सुध्दा आहे. पण यामध्ये ते आर्थिक नियोजन करायला चुकतात. मित्रांनो यांनी इन्व्हेस्टर्स कडून मिळालेले पैसे चुकीच्या पद्धतीने खर्च केले.
त्यांनी ग्राहकांना फ्री ट्रायल, कॅशबॅक, फ्री डिलिव्हरी अशा अनेक ऑफर्स दिल्या. आणि याचा बराच आर्थिक ताण त्यांच्यावर पडला. ते दूध सुध्दा मार्केट पेक्षा कमी किंमतीत देत होते. म्हणजे आता मार्केटमध्ये 45 रुपये लिटर दुध असेल तर ते 40 किंवा 42 रुपये लिटरने डिलिव्हर करायचे.
तसा त्यांचा रेव्हेन्यू 40 कोटी रुपये होता. जो की त्यामानाने चांगलाच होता.
Also Read : अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करावा | Agarbatti making business | मशीनची किंमत, साहित्य, कच्चा माल
पण आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तुमचा रेव्हेन्यू म्हणजे प्रॉफिट नाही. तुम्ही किती रेव्हेन्यू मिळवता त्यातून कामगार, लॉजीस्टिक, आणि विक्रेते यांना पैसे देऊन तसेच जागेचा भाडा, लाईट बिल असे अनेक खर्च देऊन झाल्यावर जे पैसे वाचतात तो तुमचा प्रॉफिट आहे.
जर तुमचा बिझनेस प्रॉफिटेबल नसेल तर कधीतरी तुमच्यावर बिझनेस बंद करण्याची वेळ येईलच. म्हणून बिझनेस प्रॉफिटेबल बनवण्यावर नेहमी लक्ष द्या.
2. Competitive Advantage नसणे :
मित्रांनो दूधवाला जे ग्रोसरी आणि मिल्क डिलिव्हरीच काम करायचे ते बिगबास्केट, ग्रोफर्स सारखे बिझनेस सुध्दा करायचे. आणि त्यांच्याकडे दूधवाला पेक्षा जास्त फंड्स होते. आता जास्त फंड्स मुळे ते कस्टमर्सना दूधवाला पेक्षा जास्त चांगल्या ऑफर्स देऊ शकत होते. आणि लोकांना जिकडे जास्त डिस्काउंट मिळेल तिकडेच ते जाणार. त्यामुळे दुधवाला कडे competitive advantage, वेगळेपणा नव्हता.
3. चुकीची हायरिंग
तुम्ही जर चुकीच्या लोकांना कामावर घेतलं तर तुमचा बिझनेस डुबण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. आता पहिलं म्हणजे त्यांनी चुकीच्या लोकांना कामावर घेतलं. त्याचबरोबर ओव्हर हायरिंग सुध्दा केली. ज्या लोकांची गरज नव्हती त्यांनासुद्धा कामावर घेतलं. यामुळे त्यांचा खर्च वाढला.
4. प्लॅनिंगची कमी
मित्रांनो यांना सुरुवातीला कस्टमर्स तर मिळाले, आणि फंडिंग पण मिळाली. पण त्याचा योग्य वापर कसा करायचा ते यांना जमलं नाही. आता ग्रोसरी डिलिव्हरी स्टार्टअप बिझनेस म्हटला तर त्यात इम्प्लॉयीजचा पगार दुधविक्रेत्यांचे पेमेंट, लॉजीस्टिक वाल्यांना पेमेंट करावं लागतं. त्याचबरोबर मार्केटिंग सुध्दा आलीच. याचा योग्य ताळमेळ त्यांना साधता आला नाही. ते फक्त धावत होते पण कोणत्या दिशेने धावायचं हे त्यांना माहीत नव्हतं. (Doodhwala Startup Case Study)
मित्रांनो बिझनेस करताना एक गोष्ट लक्षात ठेवा. बिझनेस हा एका मॅरेथॉन प्रमाणे आहे. इथे सुरुवातीला कोण पुढे असतो याला महत्त्व नाही, तर शेवटपर्यंत टिकून कोण बाजी मारतो याला जास्त महत्त्व आहे. म्हणून तुमचा बिझनेस एक्सपांड करताना तुम्ही स्टेडी एक्सपांशन करा. म्हणजे जवळ असलेले रिसोर्सेस वापरा आणि बिझनेस एक्सपांड करा.
5. इन्व्हेस्टर्स वर जास्त अवलंबून असणे
मित्रांनो यांना सुरुवातीला तर चांगली फंडिंग मिळाली . पण नंतर मॅनेजमेंट फंड्सचा योग्य वापर करत नसल्यामुळे इन्व्हेस्टर्सनी या स्टार्टअप मध्ये अजून जास्त पैसे इन्व्हेस्ट करण्यास नकार दिला.
मित्रांनो इन्व्हेस्टर्स आपले पैसे कोणत्याही स्टार्टअपमध्ये का इन्व्हेस्ट करतात? कारण त्यांना प्रॉफिट व्हावा. आता जर बिझनेस च योग्य प्रकारे मॅनेज होत नसेल तर ते तरी कशाला आपले पैसे इन्व्हेस्ट करणार. पैसे कमी पडल्यामुळे बिझनेस चालवणं मुश्किल झालं. डेरी, लॉजीस्टिक यांचे पेमेंट देणं बाकी होत. कामगारांना अनेक महिने पगार दिला नव्हता. शेवटी या स्टार्टअप च्या फाउंडर्सने आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना मेल करून आपला स्टार्टअप बंद करत असल्याचं सांगितलं.
यानंतर अनेकांनी त्यांच्यावर पैसे न दिल्यामुळे केस सुध्दा केल्या. म्हणूनच मित्रांनो तुम्ही जर बिझनेस करत असाल तर आर्थिक नियोजन नीट करा. दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकण हे नेहमीच एक शहानेपणाच लक्षण आहे. आशा करतो की आजच्या केस स्टडीमधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं असेल.
अशीच व्यवसायोपयोगी माहिती पाहण्यासाठी Post नोटिफिकेशन ON करा. तसेच लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी तरुण उद्योजक Whatsapp ग्रुप जॉइन करा.
Also Read : Annasaheb Patil Loan Apply 2023 | अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2023