जर तुम्हालाही अशा एका योजनेमध्ये पैसे गुंतवायचे आहेत जिथे जोखीम पत्करण्याचे प्रमाण खूप कमी आहे आणि जिथे तुम्ही निरधास्त पणे गुंतवणूक करू शकता, तर आम्ही तुम्हाला आज अशाच एका योजनेबद्दल माहिती देणार आहोत जी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि तुम्हीही या योजेनेचा लाभ घेऊ शकता.
पैशाची गुंतवणूक करत असताना आपल्याकडे भरपूर पर्याय उपलब्ध असतात त्यातीलच एक राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र किंवा NSC हे एक कमी-जोखीम गुंतवणूक म्हणून लोकप्रिय पर्याय आहे.
तर आम्ही या लेखात तुम्हाला NSC संबंधित संपूर्ण माहिती देणार आहोत. NSC म्हणजे काय? तुम्ही त्याचे खाते कोठे उघडू शकता? त्याचे फायदे आणि नुकसान आणि Post Office NSC in Marathi संबंधित इतर सर्व माहिती जाणून घेऊया या लेखातून.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) काय आहे?
NSC (नॅशनल सेविंग सर्टिफिकेट) यालाच मराठीत राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र असेही म्हटले जाते. एनएससी ही एक सरकारी योजना आहे. यामध्ये तुम्ही ५ वर्षांसाठी पैसे जमा करू शकता सुरुवातीला याचा काळ 5 आणि 10 वर्षांचा होता. पण तो आता 5 वर्षांसाठीच आहे. 5 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, तुमची एकूण ठेव आणि एकूण व्याज एकत्र करून पैसे परत केले जातात. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) हा एक निश्चित उत्पन्न गुंतवणूक पर्याय आहे जो कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये केला जाऊ शकतो.
NSC जोखीम कमी असून ते एक गुंतवणूक करण्यासाठी सुरक्षित पर्याय देखील आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) ही एक कर-बचत गुंतवणूक आहे जी तुम्हाला भारतीय रहिवासी असलेल्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये मिळू शकते. या योजनेतील गुंतवणूक NSC प्रमाणपत्र खरेदी करून केली जाते.
आता त्याची कागदी प्रमाणपत्राच्या स्वरूपात विक्री बंद करण्यात आली आहे.आता ते केवळ इलेक्ट्रॉनिक-मोड (ई-मोड) मध्ये खरेदी केले जाऊ शकतात. तुम्ही रु.1000 किंवा त्याहून अधिक रक्कम जमा करून तुम्ही त्यांना खरेदी करू शकता पण लक्षात ठेवा रक्कम ही नेहमी 100 च्या पटीत हवी.
Also Read : पैसे वाचवण्याचे प्रभावी मार्ग
एनएससी पात्रता
- प्रत्येक व्यक्ती जी भारताचा नागरिक आहे ती NSC खरेदी करू शकते .
- व्यक्ती दुसऱ्या प्रौढ व्यक्तीसोबत भागीदारी करून किंवा इतर व्यक्तींसोबत गुंतवणूक करून मुलाच्या वतीने NSC खरेदी करू शकतात.
- पण अनिवासी भारतीय किंवा इतर कोणत्याही देशातील नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत.
- HUF आणि ट्रस्ट NSC 8 व्या अंकात सहभागी होण्यास पात्र नाहीत कारण ही सरकारी प्रायोजित योजना आहे.
तुम्ही राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र कुठून खरेदी करू शकता?
म्ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका आणि तीन खाजगी बँकांतून एनएससी खरेदी करू शकता..
यात Axis बँक, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक यांचा समावेश आहे. त्यानंतर तुम्ही या सर्व बँकांमधून NSC साठी ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी तुमचे त्या बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.
तुम्ही तुमच्या इंटरनेट बँकिंगद्वारेसुद्धा NSC साठी अर्ज करू शकता. (Post Office NSC in Marathi)
हे सुद्धा वाचा : एसआयपी(SIP) काय आहे?
इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे NSC मध्ये गुंतवणूक कशी करावी?
तुमचे बँक किंवा पोस्ट ऑफिस बचत खाते असल्यास, तुम्ही एनएससीमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (ई-मोड) गुंतवणूक करू शकता. शिवाय, NSC मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बचत बँक खात्यासाठी इंटरनेट बँकिंग सुविधेची आवश्यकता असेल.
तुम्ही तुमचे बचत खाते राखले नसेल, तर ते पुन्हा सक्रिय करा आणि इंटरनेट बँकिंग सुविधेसाठी अर्ज करा. ई-एफडी किंवा ई-रिकरिंग डिपॉझिट्स सारख्या इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये तुम्ही एनएससी सहजपणे धारण करू शकता.
NSC साठी आवश्यक कागदपत्रे
NSC प्राप्त करण्यासाठी खालील कागदपत्रे पुरविली जाणे आवश्यक आहे:
- पडताळणीसाठी गुंतवणूकदारांना मूळ ओळखपत्र जसे की पासपोर्ट, कायम खाते क्रमांक (पॅन) कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र किंवा सरकारी ओळखपत्र तयार करावे लागेल.
- गुंतवणूकदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे.
- गुंतवणूकदारांना पत्त्याचा पुरावा म्हणून पासपोर्ट, टेलिफोन बिल, ऊर्जा बिल, बँक स्टेटमेंट, चेक आणि पोस्ट ऑफिसने जारी केलेले प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र आवश्यक आहे .
NSC मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे | Benefits of NSC
NSC ही सरकारी बचत योजना असल्याने त्यात तुमचे पैसे गमावण्याचा धोका नाही. त्याचबरोबर पोस्ट ऑफिस किंवा बँकेतील सर्व 5 वर्षांच्या बचत किंवा ठेव योजनांमध्ये, NSC ही सर्वात जास्त व्याज देणारी योजना आहे.
1.गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय उपलब्ध
या लेखाच्या सुरुवातीलाच आम्ही सांगितलं आहे की NSC हा एक कमी जोखमीचा गुंतवणुकीसाठी उत्तम मार्ग आहे. जर तुम्ही तुमचे पैसे बँकेत गुंतवले आणि काही कारणास्तव ते बंद पडण्याच्या मार्गावर आले, तर त्या बँकेत तुमच्या ठेवीची फक्त 1 लाखापर्यंतची हमी आहे.
परंतु एनएससी सरकारी योजना आहे. त्यामुळे NSC मध्ये गुंतवलेली रक्कम आणि त्यावर मिळणारे व्याज याची 100 टक्के हमी सरकार देते.
त्यामुळे NSC मध्ये गुंतवणूक करणे हा एक सुरक्षित पर्याय आहे.
हे सुद्धा वाचा : पैसे वाचवण्याचे प्रभावी मार्ग (Money saving tips in Marathi )
2. व्याज निश्चित राहतो
तुम्ही NSC मध्ये गुंतवणूक करताना सुरुवातीला जो व्याज ठरवला जातो. तोच व्याजदर शेवटपर्यंत राहतो त्यात बदल होत नाही.
बाकीचे व्याजदर बदलले तरी, तुम्हाला मिळणारा व्याजदर गुंतवणुकीच्या संपूर्ण कालावधीत सारखाच राहतो.
3.एनएससी वर कर सूट
तुम्ही कलम 80C अंतर्गत तुमच्या कर रिटर्नमधून NSC मध्ये गुंतवलेले 1.5 लाख रुपये वजा करू शकता. याचा अर्थ तुम्हाला कलम 80C अंतर्गत NSC मध्ये 1.5 लाखांपर्यंत कर सवलत मिळते.
NSC मध्ये मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर लागत नाही. तुम्हाला NSC वर कर सूट मिळते.
(टीप: केवळ 4 वर्षांच्या गुंतवणुकीत मिळालेल्या व्याजावर कर भरावा लागणार नाही. (पाचवे वर्ष) जेव्हा गुंतवणुकीची मुदत संपते, तेव्हा मिळालेल्या व्याजावर कर भरावा लागतो.)
4. NSC ने कर लाभ प्रदान केला आहे
NSC मध्ये गुंतवणुकीचा एक फायदा असा आहे की तुम्ही कोणत्याही बँकेत NSC तारण ठेवून कर्ज घेऊ शकता.
तुम्हाला किती कर्ज मिळेल हे वेगवेगळ्या बँकांवर अवलंबून असते. कर्जाची परतफेड केल्यानंतर, तुम्हाला तुमची NSC परत मिळेल.
5.मॅच्युरिटीनंतरही खाते वाढवता येते
जर तुम्ही मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर NSC एन्कॅश केले नाही, तर ते पुढील कालावधीसाठी आपोआप रिन्यू होत नाही. मॅच्युरिटीनंतरच्या कालावधीत, सामान्य बचत खात्याप्रमाणेच 4% व्याज मिळेल. तेही पुढील दोन वर्षांसाठीच.
पण जर तुम्हाला ते पुढील 5 वर्षांसाठी पुन्हा चालू ठेवायचे असेल, तर तुम्ही करू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला पुन्हा अर्ज करावा लागेल. ही नवीन तारखेची ठेव मानली जाईल आणि नवीन प्रमाणपत्रावरील व्याजदरही नवीन दरानुसार असेल.
6.TDS कापला जात नाही
जर एफडीवर मिळणारे व्याज 10 हजारांपेक्षा जास्त असेल, तर बँकेकडूनच टीडीएस कापला जातो.
परंतु नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये गुंतवणूक केल्यावर मिळणाऱ्या व्याजावर कोणताही टीडीएस कापला जात नाही.
आणि बरेच फायदे जे की NSC मध्ये गुंतवणुक केल्यानंतर आपल्याला भेटतात जसे की,
तुम्ही तुमच्या मुलांच्या नावाने सुद्धा NSC खरेदी करू शकता.
तुम्ही जॉइंट अकाउंट सुद्धा ओपन करू शकता. जॉइंट अकाउंटसाठी 3 व्यक्तींची मर्यादा असते.
एक व्यक्ती एका नावाने कितीही NSC खरेदी करू शकतो.
NSC मधील गुंतवणूकीची रक्कम किमान 100 रुपयांपासून सुरू होते.
NSC तुम्ही एक security च्या रुपात ठेवून बँकेतून लोन घेऊ शकता.
हे सुद्धा वाचा : मुच्युअल फंड बद्दल संपूर्ण माहिती
NSC मध्ये गुंतवणूक करण्याचे नुकसान
1.मुदतीच्या काळापूर्वी पैसे काढता येत नाहीत
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्ही 5 वर्षे संपण्यापूर्वी एकदा गुंतवलेली रक्कम काढू शकत नाही. तुम्हाला एकूण रक्कम ही पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर भेटते..
ठराविक परिस्थितीतच मुदतीपूर्वी पैसे काढता येतात. जर NSC खरेदीदाराचा किंवा संयुक्त खातेदाराच्या(Joint Account Holder) मृत्यू झाला तर ही रक्कम वेळेपूर्वी मिळू शकते.
किंवा ही रक्कम न्यायालयाच्या आदेशानेच मुदत संपण्यापूर्वी मिळू शकते.
2. पाच वर्षानंतर करात सूट भेटत नाही
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये गुंतवणुकीचा मिळालेले व्याज केवळ 4 वर्षांसाठी करमुक्त आहे. पाचव्या वर्षी मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागतो.
NSC चे नुकसान लक्षात घेता NSC हा गुंतवणूक करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. ही सरकारी योजना असण्याकारणाने जोखीम सुद्धा कमी आहे.
3. मॅच्युरिटीपूर्वी खाते बंद केल्यास होणारा तोटा
जर तुम्ही 1 वर्षाच्या आत खाते बंद केले तर तुम्हाला कोणतेही व्याज मिळणार नाही. तुम्हाला फक्त जमा केलेली रक्कम परत मिळेल.
जर तुम्ही 1 वर्षानंतर आणि 5 वर्षापूर्वी खाते बंद केले तर व्याज कापून पैसे परत केले जातील.
निष्कर्ष :
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये गुंतवणूक करायची की नाही हा सर्वस्व तुमचा निर्णय आहे. ज्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर स्टॉक मार्केटमध्ये पैसे न गुंतवता, जोखीम न घेता चांगले व्याज मिळवायचे आहे, त्यांच्यासाठी NSC हा उत्तम पर्याय आहे. ते नक्कीच NSC मध्ये गुंतवणूक करू शकतात.
गुंतवणूक करण्यापूर्वी, गुंतवणुकीचा कालावधी संपेपर्यंत गुंतवलेली रक्कम परत करता येणार नाही याचा विचार लक्षात ठेवा. NSC मध्ये गुंतवणूक करण्याआधी तिच्याबद्दल सर्वप्रकारे जागरूक रहा.
तर मित्रांनो, ही होती NSC किंवा National Saving Certificate ची माहिती. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत, परिवारातील सदस्यांसोबत शेअर करा.
हे सुद्धा वाचा :
- एसआयपी(SIP) काय आहे?
- पैसे वाचवण्याचे प्रभावी मार्ग
- मुच्युअल फंड बद्दल संपूर्ण माहिती