Chai Sutta Bar Franchise Price : पाण्यानंतर चहा हे जगातील सर्वात जास्त पिल जाणार पेय आहे. भारतात तुम्हाला गल्लोगल्ली चहाची दुकान पाहायला मिळतील. 10 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत आणि टपरी पासून ताज हॉटेल पर्यंत सगळीकडे चहा मिळते. पण हे क्षेत्र Un-Organized होत. त्याचवेळी 2016 मध्ये इंदोर शहरात Chai Sutta Bar या स्टार्टअपची सुरूवात झाली.
आज या स्टार्टअपच्या जगभरातील 195+ शहरांत 450+ Franchise आहेत. आणि या स्टार्टअपचा वार्षिक टर्नओव्हर 100 कोटींपेक्षा जास्त आहे. या ब्लॉग मधून आपण Chai Sutta Bar Franchise बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.
चाय सुट्टा बारची सुरुवात
Chai Sutta Bar चे Founder अनुभव दुबे हे मध्य प्रदेशच्या रिवा येथील आहेत. प्रत्येक भारतीय पालकांप्रमाणे अनुभवच्या वडिलांना सुध्दा आपला आपला मुलगा कलेक्टर व्हावा अस वाटत होतं. त्यासाठी अनुभव कॉलेजनंतर दिल्लीला गेला. सर्वकाही ठीक चालू होतं.
एके दिवशी अनुभवला त्याचा मित्र आनंदचा फोन आला आणि बोलता बोलता त्यांनी चहाचा बिझनेस करायचं ठरवलं, ज्याबद्दल कॉलेजमध्ये ते बोलायचे. अनुभव मग पुन्हा इंदोर ला गेला.
त्या दोघांकडे मिळून अडीच ते तीन लाख रुपये भांडवल होत.
यातून त्यांनी चहाच आऊटलेट सुरू करायचं ठरवलं. ते ही अशाप्रकारे की कोणतीही व्यक्ती व्यवस्थित बसून चहा पिऊ शकेल. आणि ते ही कमी किंमतीत.
त्याच आउटलेट च नाव त्यांनी Chai Sutta Bar असं ठेवलं. नवीन संकल्पना आणि चांगला दर्जा यांमुळे त्यांच्या स्टार्टअपला सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळाला. आज त्यांचे जगात 450 पेक्षा जास्त आउटलेट आहेत.
Also Read : प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना 2023
चाय सुट्टा बारची खासियत
- हे स्टार्टअप चहा कपात न देता मातीच्या Kulhad मध्ये देते.
- येथे तुम्हाला रेग्युलर चहा बरोबर चहाच्या 100 पेक्षा जास्त व्हारायटी पाहायला मिळतील.
- चहा बरोबर तुम्हाला पिझ्झा, बर्गर, फ्राइज, सँडविच आणि इतर पॉकेट फ्रेंडली स्नॅक्स सुद्धा इथे मिळतील.
- चहा सोबत त्यांनी Ambience वर सुद्धा जास्त फोकस केला. जेणेकरून लोक जास्त वेळ तेथे घालवतील.
Chai Sutta Bar Franchise Price
भारतात Chai Sutta Bar फ्रेंचाइस सुरू करण्यासाठी तुम्हाला 6 लाख रुपये फ्रेंचाइस फी द्यावी लागेल. त्याच बरोबर तुम्हाला इतर सर्व खर्च पकडून Chai Sutta Bar franchise सुरू करण्यासाठी एकूण 16 लाखांची गुंतवणूक लागेल. त्याच बरोबर तुम्हाला 4% रॉयल्टी सुद्धा द्यावी लागेल.
Franchise सुरू करण्यासाठी तुम्हाला 300 ते 400 स्क्वेअर फूट जागा लागेल. तसेच मशीनरी साठी 3 लाख, फर्निचर आणि इंटिरियर साठी 5 लाख, Raw Material साठी 2 लाख, आणि फ्रेंचाइस फी अशी एकूण 16 लाख रुपये गुंतवणूक होईल.
Chai Sutta Bar Franchise Profit
या फ्रेंचाइस साठी Payback Period साधारण 18 महीने आहे. या व्यवसायात प्रॉफिट मार्जिन साधारण 35%-40% आहे. साधारण एक आउटलेट महिन्याला 90 हजार रुपयांचा प्रॉफिट कमावतो. म्हणजे तुमची गुंतवणूक वसूल होऊन नेट प्रॉफिटेबल होण्यासाठी तुम्हाला साधारण 18 महिन्यांचा कालावधी लागेल.
How to apply for Chai Sutta Bar फ्रेंचाइस – चाय सुट्टा बारच्या फ्रेंचाइस साठी अप्लाय कसे करावे?
- सर्वात आधी Chai Sutta Bar Official वेबसाइट वर जा.
- मग वर तुम्हाला Franchise नावाचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
- आता समोर आलेल्या फॉर्ममध्ये तुमची पूर्ण माहिती भरा.
- माहिती भरून झाली की Send बटणावर क्लिक करा.
- काही दिवसांत Chai Sutta बारची टीम तुम्हाला Contact करेल.
Also Read : असा सुरू करा पेपर कप मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय
Conclusion – निष्कर्ष
Chai Sutta Bar हा भारतातील एक वेगाने वाढणार स्टार्टअप आहे. चहाच सेक्टर काही प्रमाणात Organized झाल आहे. त्यात सुद्धा फक्त 10 रुपयांत चहा मिळतो, त्यामुळे बरेच जण चहा पिताना जास्त विचार करत नाही.
चाय सुट्टा बारचा डिजिटल प्रेझेंस सुद्धा चांगला आहे. त्याचबरोबर कामगारांना कंपनीकडून ट्रेनिंग सुद्धा दिली जाईल. त्यांची प्रॉडक्ट रेंजसुद्धा चांगली आहे. अनेक प्रकारच्या चहा तिथे तुम्हाला मिळतात. रॉयल्टी साधारण 4% आहे.
तुम्हाला जर रेडिमेड बिझनेस प्लॅन, प्रॉडक्ट हवा असेल आणि तेवढी गुंतवणूक करण्याची तुमची क्षमता असेल तर Chai Sutta Bar ची फ्रेंचाइस तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल. जर तुम्हाला कॉलेज, कॉर्पोरेट ऑफिसेस जवळ चांगली लोकेशन मिळाली तर तुम्ही महिन्याला 1 लाख रुपयांपर्यंत सहज कमाई करू शकता.
जर ब्लॉग आवडल्यास फेसबुक आणि Whatsapp वर नक्की शेअर करा. असेच महत्त्वाचे पोस्ट नियमित पाहण्यासाठी पोस्ट नोटिफिकेशन ऑन करा.
Comments 1