Navnoor Kaur Jaggercane : पंजाबच्या नवणूर कौर (Punjab Entrepreneur Navnoor Kaur) या उद्योजिकेने कौशल सिंग यांच्यासोबत मिळून सुरू केला Jaager Cane हा स्टार्टअप. साखरेचा एक आरोग्यदायी पर्याय म्हणून गुळाला प्रोमोट करण्याचा त्यांचा हेतू आहे. चला जाणून घेऊयात त्यांचा प्रवास.
अशी सुचली व्यवसायाची कल्पना
नवणूर IIM गाझियाबाद येथे MBA च शिक्षण घेत होत्या. त्याचवेळी नवणूर यांच्या घरात साखरेऐवजी गूळ वापरला जाऊ लागला.
गूळ (Jaggery) हे साखरेपेक्षा आरोग्यदायी आहे आणि त्याचे अनेक फायदे असतात. म्हणूनच गुळाला प्रमोट करण्याचा विचार नवणूर यांच्या मनात आला.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या एका बँकेत चांगल्या पदावर नोकरीला लागल्या. नोकरी करत असताना त्यांनी आपल्या आयडियाचे बिझनेसमध्ये रुपांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले.
गुळ हा मार्केटमध्ये सुटा विकला जायचा. गुळाचा कोणताही ब्रँड तेव्हा मार्केटमध्ये नव्हता.
घरातील किचनमधून सुरुवात
नवणूर यांनी घरातच किचनमध्ये रेसिपीज सोबत प्रयोग करायला सुरुवात केली. आणि गुळाशी संबंधित कोणते प्रॉडक्ट मार्केटमध्ये विकता येतील हे ठरवले.
लोकांची फीडबॅक घेण्यासाठी त्यांनी Door to door मार्केटिंग सुध्दा केली. लोकांचा चांगला प्रतिसाद पाहून त्यांचा आत्मविश्वास वाढला.
प्रोडक्ट तर फायनल झाला पण आता मॅनुफॅक्चरींगचा प्रश्न होता. त्याचवेळी त्यांची भेट कौशल सिंग यांच्यासोबत झाली. कौशल सुध्दा एक MBA ग्रॅज्युएट आहे.
त्याच्याकडे गुळाची मॅनुफॅक्चरींग करण्यासाठी युनिट होते. मग दोघांनी एकत्र मिळून Jagger Cane या ब्रँड वर काम करण्याचे ठरवले.
Navnoor यांनी त्यांनी बचत केलेले 5 लाख रुपये व्यवसायात गुंतवले.
Navnoor या व्यवसायाची Branding, ऑपरेशन्स aani इतर गोष्टी बघतात तर कौशल मॅनुफॅक्चरींग सांभाळतात.
व्यवसाय करण्यासाठी सोडली चांगल्या पगाराची नोकरी
2021 मध्ये Navnoor यांनी त्यांचा जॉब सोडला आणि Jagger Cane या त्यांच्या ब्रँडसाठी पूर्णवेळ काम करायला सुरुवात केली.
सेल्स वाढत गेले. लोकांचा चांगला प्रतिसाद त्यांना मिळाला. Jagger Cane स्टार्टअप गुळाची पावडर, क्युब्स तसेच गुळापासून तयार केलेले प्रॉडक्ट्स विकतो.
हे प्रॉडक्ट्स 100% केमिकल फ्री आहेत. भारतासोबतच दुबई, सिंगापूर, ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा त्यांचे प्रॉडक्ट एक्सपोर्ट होतात.
आता त्यांच्या व्यवसायाचा वार्षिक टर्न ओव्हर 2 कोटींपेक्षा जास्त आहे. 25 पेक्षा जास्त लोकांना त्यांच्यामुळे रोजगार मिळाला आहे.
जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आताच फेसबुक आणि Whatsapp वर शेअर करा. व्यवसायविषयक माहिती पाहण्यासाठी आताच तरुण उद्योजक Whatsapp ग्रुप जॉइन करा. लिंक : https://chat.whatsapp.com/Hw56DYRSUI55iKv2AQ47YS