जर तुम्हाला स्वतःचा मेडिकल स्टोअर सुरू करायचा असेल तर Generic Aadhaar Franchise घेऊन तुम्ही चांगली कमाई करू शकता. Generic Aadhaar हा एक जेनरिक औषधे पुरवणारा स्टार्टअप आहे. या लेखामधून आम्ही Generic Aadhaar Franchise Cost, Qualification यांबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत.
Generic Aadhaar नक्की काय आहे?
जेनरिक आधार हा एक भारतीय स्टार्टअप असून तरुण मराठी उद्योजक अर्जुन देशपांडे यांनी वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी या स्टार्टअपची सुरुवात केली. त्यांना Pharma Wonder Kid म्हणून ओळखलं जातं.
हा स्टार्टअप जेनरिक औषधे विकतो. कमी किंमतीत लोकांना चांगल्या दर्जाची औषधे उपलब्ध व्हावी या उद्देशाने त्यांनी या स्टार्टअपची सुरूवात केली. सर रतन टाटा यांनी त्यांचा हाच उद्देश पाहून या स्टार्टअप मध्ये गुंतवणूक केली आहे.
Generic Aadhaar Products
जेनरिक आधार मध्ये Generic औषधे विकली जातात. ही औषधे ब्रँडेड औषधांपेक्षा 80% पर्यंत स्वस्त असतात. मागच्या काही काळापासून जेनरिक औषधांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आणि यापुढे सुध्दा त्यांची मागणी वाढतच जाणार आहे.
जेनरिक आधारच्या प्रॉडक्ट लिस्टमध्ये 700 पेक्षा जास्त औषधे आणि 150+ सर्जिकल प्रॉडक्ट्स सामील आहेत.
Generic Aadhaar Franchise Cost
जेनरिक आधारची Franchise घेण्यासाठी investment जी दुकानाच्या जागेवर अवलंबून आहे. जर जागा तुमच्या मालकीची असेल तर तुम्हाला खर्च कमी येईल. जर जागा स्वतःच्या मालकीची नसेल तर त्यासाठी जास्त खर्च येईल.
आता आपण जागा तुमच्या स्वतःच्या मालकीची आहे असं गृहीत धरून Total Franchise Cost पाहूया.
Franchise Fee – ₹1 लाख रुपये+ 18% GST
इतर खर्च – 3 ते 4 लाख रूपये.
एकूण गुंतवणूक – अंदाजे ₹ 5 लाख रूपये.
Generic Aadhaar Profit Margin
जेनरिक आधारची Franchise घेऊन तुम्ही चांगली कमाई करू शकता. त्यांच्या प्रॉडक्ट्सवर तुम्हाला जवळपास 40% पर्यंत प्रॉफिट मार्जीन मिळेल.
भारतात अनेक औषधे ही जेनरिक औषधे आहेत. भारत हा जेनरिक औषधांचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार आहे. पण काही फार्मा कंपन्या हेच जेनरिक औषध ब्रँडेड म्हणून मार्केट करतात. त्यामुळे त्याची किंमत वाढते. पण जेनरिक आधार हीच हाय क्वालिटी ची औषधे कमी किंमतीत विकतो. जेनरिक आधारची सगळी औषधे WHO -CGMP फॅसिलिटी मधून असतात आणि त्यावर एमआरपी च्या 80% पर्यंत डिस्काउंट मिळतो.
जेनरिक आधारची Franchise घेण्यासाठी Degree लागते का?
जर भारतात तुम्हाला मेडिकल स्टोअर सुरू करायचं असेल तर B.Pharm किंवा D.Pharm ची डिग्री असणं आवश्यक आहे. पण Generic Aadhaar ची Franchise घेण्यासाठी तुम्हाला ही Degree असणं आवश्यक नाही.
डिग्री नसताना सुध्दा तुम्ही Generic Aadhaar Franchise घेऊ शकता. फक्त तुम्हाला तिथे अशा व्यक्तीला ठेवाव लागेल, ज्याच्याकडे फार्मसीची डिग्री असेल.
जेनेरीक आधार फ्रेंचाइस साठी लागणारी कागदपत्रे – Documents Needed for Generic Aadhaar Franchise
आधार कार्ड
पॅनकार्ड
बँक पासबुक
पत्त्याचा पुरावा
पासपोर्ट साईज फोटो, ई – मेल, मोबाइल नंबर
GST Number
प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स
NOC
इत्यादी
Generic Aadhaar Franchise Income
जर तुमच्याकडे स्वतःची जागा असेल तर जेनेरीक आधार फ्रेंचाइस घ्यायला तुम्हाला किमान 5 लाखांची गुंतवणूक लागेल. हा ब्रॅंड तुम्हाला 40% पर्यंत प्रॉफिट मार्जिन देतो. म्हणजे तर तुम्ही महिन्यात 3 लाखांची औषधे विकली तर तुम्हाला जवळपास 80 हजारांचा नफा होईल. त्यातून जर काही किरकोळ खर्च, कामगारांचे पगार, वीज बिल यांचा खर्च पकडला तर तुम्ही Generic aadhaar च्या Franchise मधून महिन्याला साधारण 50 हजार रुपये कमवू शकता.
Generic Aadhaar Application Process – How to apply for Generic aadhaar Franchise
जर तुम्हाला Generic Aadhaar Franchise घ्यायची असेल तर खालील स्टेप्स फॉलो करा.
सर्वात आधी genericaadhaar.com/franchise-opportunities.php या लिंकवर जा.
तिथे तुमचे नाव, मोबाईल नंबर, ई – मेल आयडी, राज्य आणि सध्याचं प्रोफेशन ही माहिती भरा.
मग Send बटनवर क्लिक करा.
ही माहिती कंपनीकडे जाईल. मग कंपनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल.
Generic Aadhaar Contact Number
For Retail Franchise :
West India: +91 85913 11215, North India: +91 86579 60947, East India: +91 96533 73641, South India: +91 93213 57292
For City Master Franchise : +91 9653373639
E-mail : [email protected]