Success Story of Ashay Bhave : आशय भावे हा मराठी उद्योजक प्लॅस्टिक पासून शूज बनवणाऱ्या ‘Thaely’ या स्टार्टअपचा Founder आहे. दरवर्षी 100 अब्जांपेक्षा जास्त प्लॅस्टिक बॅग जगभरात वापरल्या जातात. ज्यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमणावर हानी होते. यावरच उपाय म्हणून आशयला प्लॅस्टिक बॅगपासून शूज बनवण्याची कल्पना सुचली.
Thaely या स्टार्टअप बद्दल माहिती
आशय भावे यांचा Thaely स्टार्टअप प्लॅस्टिक बॅग Recycle करून त्यापासून शूज बनवतो. सुरुवातीला ते एका वेस्ट कलेक्शन कंपनीकडून प्लॅस्टिक बॅग आणि ईतर प्लॅस्टिक कचरा घेतात. त्यानंतर त्या बॅग्स गरम पाण्याने धुतल्या जातात. आणि त्यापासून ThaelyTex नावाचा टेक्सटाइल बनवतात. या टेक्सटाइल मध्ये केमिकल नसतात.
एक स्निकर/शूज बनवण्यासाठी 10 ते 12 प्लॅस्टिक बॅग्सचा वापर केला जातो. या शुजची किंमत $110 डॉलर्स आहे आणि हे शुज जगभरात Deliver केले जातात.
आशय याला 2017 मध्ये BBA करताना ही कल्पना सुचली. सध्या ही कंपनी छोटी असली तरी त्यांना युरोप आणि अमेरिकन बाजारात रिटेल स्टोअर्स सूरु करायचे आहेत. तसेच या स्टार्टअपला अजून मोठ्या उंचीवर न्यायचे आहे.
हे सुद्धा वाचा : TOP 15 गृहिणींसाठी व्यवसाय कल्पना | Business Ideas For Housewife In Marathi [2023]
Thaely Startup चा प्रवास (Ashay Bhave)
- 2017-18 या दोन वर्षांमध्ये प्लॅस्टिक बॅगपासून फॅब्रिक डेवलप केला.
- त्यानंतर मुंबईतील एका चप्पल शिवणाऱ्या दुकानातून शूजचा Rough प्रोटोटाइप बनवला. याचा उद्देश म्हणजे हा फॅब्रिक व्यवस्थित युज करता येतो की नाही, हे पाहणे होता.
- ती टेस्ट यशस्वी झाली. त्यानंतर 2019 मध्ये दुबईतील एका स्टार्टअप स्पर्धेत हे शूज आणि बिझनेस प्लान प्रेझेंट केला. त्या स्पर्धेत या आयडियाला प्रथम क्रमांक मिळाला.
- त्यानंतर या स्टार्टअपला Funding मिळाली. आणि दुसऱ्या प्रोटोटाइपच प्रोडक्शन सुरू झाल.
Thaely Valuation
Thaely च्या सोशल मीडियावरील पोस्टनुसार Thaely या स्टार्टअपच Valuation $10 मिलियन अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त झालं आहे. $43.20 चा प्रोटोटाईप बनवण्यापासून या स्टार्टअपची सुरुवात 2019 मध्ये झाली. आणि आता या स्टार्टअपच valuation कोटींच्या घरात आहे.
एक मराठी उद्योजक आपल्या अनोख्या कल्पनेतून जगभरात आपली मान उंचावत आहे, ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे.
Thaely Website : https://thaely.com/
अशाच उद्योजक यशोगाथा पाहण्यासाठी tarunudyojak.कं वेबसाईटला भेट द्या आणि Notification on करा.