• About Us – Tarun Udyojak
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact Us
तरुण उद्योजक
  • Home
  • उद्योजक यशोगाथा
  • बिझनेस
    • बिझनेस न्यूज
  • सरकारी योजना
  • बिझनेस आयडिया
  • फ्रेंचायझी
  • फायनान्स
  • स्टार्टअप
No Result
View All Result
  • Home
  • उद्योजक यशोगाथा
  • बिझनेस
    • बिझनेस न्यूज
  • सरकारी योजना
  • बिझनेस आयडिया
  • फ्रेंचायझी
  • फायनान्स
  • स्टार्टअप
No Result
View All Result
तरुण उद्योजक
No Result
View All Result

एक लाखात सुरू करता येणारे व्यवसाय | Businesses we can Start under 1 Lakh Rs.

by Team Tarun Udyojak
Reading Time: 5 mins read
1
Businesses we can Start under 1 Lakh Rs
525
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

तुम्ही 1 लाखाच्या गुंतवणुकीमध्ये व्यवसाय सुरू करायचा विचार करत आहात का ? तुम्हाला तुमची स्वतःची सुरुवात करायची आहे का ? आणि तेही कमी गुंतवणुकीचा व्यवसाय? मग हा लेख फक्त तुमच्यासाठी आहे. या लेखात आम्ही तुम्हाला 1 लाखांच्या गुंतवणुकीत सुरू करता येणारे व्यवसाय (Businesses we can Start under 1 Lakh Rs) सांगणार आहोत.

एक काळ असा होता की (small businesses) लघुउद्योजक आणि (small business owners) लघुउद्योजकांना मिळायला हवी ती ओळख भारतात मिळत नव्हती. लोकांना स्थानिक बाजारांपेक्षा मॉल्स आणि हाय-एंड स्टोअरमध्ये खरेदी करणे अधिक आकर्षक वाटत असे .

मात्र गेल्या काही वर्षांत भारतात मोठा बदल झाला आहे. लोकांचा Small Businesses कडे बघण्याचा दृष्टिकोण बदलला आहे. आज पाहिल तर , मॉल्समध्येही पॉप-अप स्टँड आणि आठवडा बाजार आहेत जेथे small business owners त्यांची उत्पादने विकू शकतात.

भारतातील MSMEs हे भारतीय अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग बनले आहेत आणि राष्ट्रीय जीडीपीमध्ये सुमारे 30% आणि एकूण निर्यातीसाठी 40% योगदान देत आहेत.

असे असले तरी, उद्योजकतेची भावना असलेले अनेक लोक व्यवसाय सुरू करण्यास कचरतात, मुख्य कारण म्हणजे लोकांना वाटते की व्यवसाय स्थापित करण्यासाठी त्यांना खूप गुंतवणूक करावी लागेल !

जर तुम्हीसुद्धा अशा लोकांपैकी एक असाल तर हा लेख वाचून तुमचं हा गैरसमज नक्की दूर होईल आणि तुम्हाला काही अशा कल्पना मिळतील जिथे तुम्ही 1 लाख पेक्षा कमी गुंतवणुकीमध्ये व्यवसाय सुरू करू शकता. (Businesses we can Start under 1 Lakh Rs)

आम्ही या लेखातून कमी गुंतवणूक करून सुरू करता येणारे (Businesses we can Start under 1 Lakh Rs) पण अत्यंत फायदेशीर असे व्यवसाय या ब्लॉगमध्ये सांगितले आहेत. त्यासाठी पूर्ण ब्लॉग नक्की वाचा.

2022 मध्ये 1 लाखांपेक्षा कमी गुंतवणुकीत व्यवसायासाठी फायदेशीर कल्पना शोधणे सोपे नाही. जर तुमच्याकडे कमी गुंतवणूक पण योग्य जिद्द आहे स्वह:ताच व्यवसाय उभे करण्याची तर तुम्ही अगदी बरोबर जागी आहात.

हे स्टार्टअप्सचे युग आहे. स्टार्टउप्स वेगाने वाढत आहेत. तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी यापेक्षा चांगला वेळ नाही. नोकरी हा चांगली रक्कम कमावण्याचा एक उत्तम मार्ग असू शकतो, परंतु तुमचा स्वतःचा व्यवसाय असणे एक चांगली कल्पना असू शकते. तथापि, आपल्यापैकी बहुतेकांना असे वाटते की व्यवसाय म्हणजे मोठी गुंतवणूक. अगदी कमी गुंतवणुकीत काही व्यवसाय सुरू केले जाऊ शकतात.

या लेखात आम्ही आमचे टॉप 6 बिझनेस शेअर करणार आहोत जे तुम्ही 1 लाखांपेक्षा कमी गुंतवणुकीत सुरू करू शकता. चला तर मग पाहुयात ते व्यवसाय कोणते आहेत.

1.CANDLE MAKING BUSINESS ( मेणबत्ती व्यवसाय )

candle making business

मेणबत्त्या अशा उत्पादनांपैकी एक आहेत ज्यांना नेहमीच मागणी असते आणि हा एक अत्यंत लोकप्रिय व्यवसाय आहे. मेणबत्त्या विक्री हा व्यवसाय प्रारंभीक भांडवल मध्ये सुरू करता येईल असा उत्तम पर्याय समजला जातो कारण तो कमी गुंतवणुकीमद्धे सुरू करता येतो.

मेणबत्त्या या अनेक ठिकाणी वापरल्या जातात. विशेषतः धार्मिक कार्यासाठी त्यांचा सर्वात जास्त वापर होतो. विशेषत: गणेशोत्सव आणि दिवाळी अशा उत्सवादरम्यान त्यांना अधिक मागणी असते .

मेणबत्त्या व्यवसाय सुरू करण्यासाठी जवळ जवळ 20,000-रु. 30,000 इतकी रक्कम पुरेशी आहे. तसेच तुम्ही जरा जास्त गिनतावणूक करून ऑटोमॅटिक मशीन सुद्धा खरेदी करू शकता. मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय आपल्या घरासारख्या छोट्या जागेत सुरू केला जाऊ शकतो. तसेच कच्चा माल आणि काही मेणबत्ती बनवण्याची उपकरणे व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेशी आहेत. नंतर तुम्ही मागणीनुसार ते मोठे करू शकता.

Indiamart वर तुम्हाला ही मशीन मिळेल. ( किंमत 65,000 रुपये )

2.PICKLES ( लोणचे ) (Businesses we can Start under 1 Lakh Rs)

भारतातील जवळपास प्रत्येक घरात तुम्हाला लोणच्याची बरणी मिळेल. फक्त भारतातच नाही तर विदेशात सुद्धा विविध प्रकारच्या लोणाच्याला प्रचंड मागणी आहे. आणि यात नवनवीन प्रयोग सुद्धा तुम्ही करू शकता.

म्हणून लोणच्याचा व्यवसाय हा तुम्हाला कमी गुंतवणुकीपासून सुरु करण्याचा एक उत्तम उपाय आहे. भारतीय लोणच्यांची मागणी केवळ देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठा मद्धे ही जास्त आहे.

मसाला उद्योग तसेच केळीचे वेफर्स बनवण्याचा उद्योग, टोमॅटो सॉस उद्योग अशा 25 पेक्षा जास्त व्यवसायांबद्दल माहिती मिळवण्यासाठी क्लिक करा.

लोणचे बनवायला सुरुवात करण्यासाठी ₹ 20,000 ते ₹ 25,000 चे भांडवल पुरेसे आहे. ह्या व्यवसायात जर तुम्हाला रेसिपी चांगल्या प्रकारे माहित असेल तर तुमच्याकडे हा व्यवसाय वाढण्याची चांगली संधि असू शकते.

3.INCENSE STICKS ( अगरबत्ती )

agarbatti business

भारतातील अगरबत्ती विक्रीचा व्यवसाय लक्षणीय मागणीमुळे इतर देशांमध्ये सुद्धा विस्तारत आहे. जगभरात जे लोक अध्यात्मिक विधी, योगा इ. मध्ये आहेत त्यांच्यामुळे अगरबत्ती (incense sticks and sage sticks ) यांच्या मागणीमध्ये खूप वाढ झाली आहे. भारत आता जगभरात अगरबत्ती निर्यात करतो.

प्रत्येक घरात तसेच दुकानात अगरबत्तीचा वापर केला जातो. वेगवेगळ्या सुवासाच्या अगरबत्ती बाजारात उपलब्ध आहेत.

जगभरात अगरबत्तीच्या काड्या बनवणाऱ्या ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक मशीनची किंमत ₹ 50,000 पासून सुरू होते, मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी ही यंत्रे उपयुक्त ठरतात.

अगरबत्ती व्यवसायबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी हा ब्लॉग नक्की वाचा :

अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करावा | Agarbatti making business | मशीनची किंमत, साहित्य, कच्चा माल

4.COCONUT HAIR OIL ( खोबरेल तेल)

आजकाल लोक तेल वापरण्यात अधिक जागरूक आहेत आणि त्यापैकी बहुतेक नैसर्गिक वापरण्यास प्राधान्य देतात. आणि लोक जास्त पैसे द्यायला जास्त विचार करत नाहीत जेव्हा प्रश्न त्यांच्या सौंदर्याचा आणि आरोग्याचा असतो.

त्यामुळे Coconut Oil बनवण्याचा छोटा व्यवसाय सुरू करणे ही एक खूप चांगली कल्पना आहे, कारण त्याची गुंतवणूक ही देखील सुमारे 1 लाख रुपये आहे.

5.HOME TUTORING SERVICE

अगदी कमी गुंतवणुकीत तुमचा व्यवसाय सुरू करण्याचा Home Tutoring अर्थात शिकवणी वर्ग हा एक उत्तम मार्ग आहे. तुम्ही विद्यार्थ्यांना संध्याकाळच्या सोयीच्या वेळी Home tutoring service देऊ शकता.

अगदी छोटीशी जागा थोडस furniture हा व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसे आहे. किंवा तुम्ही हा व्यवसाय ऑनलाइन माध्यमाद्वारे देखील करू शकता. Zoom, Google Meet या माध्यमांचा तुम्हाला यासाठी उपयोग होईल. जर तुम्ही ऑनलाइन शिकवणी सुरू केली तर हा व्यवसाय अगदी काही हजारात सुरू करू शकता.

तुम्ही या व्यवसायाची सुरुवात तरूणांनाना संधि देऊन करू शकता आणि त्यामुळे तुम्हाला योग्य दिशा मिळेल पुढे जाण्याची. जर हा व्यवसाय तुम्हाला ऑफलाइन करायचं असेल, तर या व्यवसायासाठी तुम्हाला जागा आणि जाहिरात या दोन गोष्टींसाठी लागणारी भांडवलीची गरज आहे.

20250331 000819

6.BAKERY BUSINESS

bakery business

जर तुम्ही तुमची आवड म्हणून बेकिंग करणारी व्यक्ती असाल, तर बेकिंग व्यवसाय किंवा बेकरी सुरू करणे हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे . तुमची गुंतवणूक ही कमी ठेवण्यासाठी तुम्ही तुमचा व्यवसाय तुमच्या घरातून सुरू करू शकता किंवा क्लाउड किचन येथून सुरू करू शकता.

या प्रकारच्या होम बेकरी आणि क्लाउड किचन व्यवसायमध्ये तुमचे काम हे फक्त म्हणजे आवश्यकतेनुसार अन्नपदार्थ शिजवणे आणि वितरीत करणे. आणि तेथे कोणतेही बसण्याची व्यवस्था करण्याचा त्रास नसतो आणि या व्यवसायासाठी लागणारी गुंतवणूकही कमी आहे.

तुम्हाला जर Businesses we can Start under 1 Lakh Rs हा ब्लॉग आवडला तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हा ब्लॉग कसा वाटला याबद्दल प्रतिक्रिया नक्की द्या.

आमचे इतर ब्लॉग वाचा :

व्हर्टिकल फार्मिंग | Vertical Farming in Marathi | कमी जागेत फायदेशीर शेती

पेपर कप व्यवसाय कसा सुरू करावा | Paper Cup Manufacturing Business In Marathi

Tags: businessbusiness idea
SendShareTweet

हे पण वाचा !!

Mushroom Farming in Marathi – कमी गुंतवणुकीत मशरूम शेती करून कमवा महिन्याला 30 हजार ते 1 लाख रुपये !!

Mushroom Farming in Marathi – कमी गुंतवणुकीत मशरूम शेती करून कमवा महिन्याला 30 हजार ते 1 लाख रुपये !!

by prasannawagh146
April 3, 2025
0

जर तुम्ही कमी गुंतवणुकीतून शेतीशी निगडित काही करू इच्छित असाल,...

Microgreen Farming

Microgreen Farming in India : मायक्रोग्रीन फार्मिंग व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती

by prasannawagh146
April 2, 2025
1

मायक्रोग्रीन्स म्हणजे लहान रोपे, जी 7 ते 21 दिवसांत तयार...

How to start gift Shop Business in Marathi

गिफ्ट शॉप व्यवसाय कसा सुरू करावा | How to start gift Shop Business in Marathi

by Team Tarun Udyojak
May 9, 2023
0

जर तुम्ही सदाबहार व्यवसायाच्या शोधात असाल जो दीर्घकाळ टिकेल, तर...

Medical Store Business Plan in Marathi

मेडिकल स्टोअर कसा सुरू करावा | Medical Store Business Plan in Marathi

by Team Tarun Udyojak
October 6, 2023
0

Medical Store Business Plan in Marathi : मेडिकल स्टोअर हा...

मसाला उद्योग प्रोजेक्ट रिपोर्ट पीडीएफ

मसाला उद्योग प्रोजेक्ट रिपोर्ट पीडीएफ

by Team Tarun Udyojak
March 31, 2025
0

मसाला उद्योग प्रोजेक्ट रिपोर्ट पीडीएफ (Masala Udyog Project Report PDF)...

Next Post
India Post Franchise

फक्त 5 हजार भरा आणि मिळवा पोस्ट ऑफिस फ्रेंचायझी - India Post Franchise 2023

Comments 1

  1. Pingback: फक्त 5 हजार भरा आणि मिळवा पोस्ट ऑफिस फ्रेंचायझी - India Post Franchise 2023

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Ekart Logistics Franchise

Ekart Logistics Franchise कशी घ्यायची? कमाई,पात्रता, फ्रेंचाइस फी

January 30, 2024
मसाला उद्योग प्रोजेक्ट रिपोर्ट पीडीएफ

मसाला उद्योग प्रोजेक्ट रिपोर्ट पीडीएफ

March 31, 2025
Small business ideas in Pune

Small business ideas in Pune | पुण्यात सुरू करता येणारे व्यवसाय

February 17, 2023
Hydroponic Farming

Hydroponic Farming : हायड्रोपोनिक शेती विषयी माहिती

March 14, 2023
Paper Cup Manufacturing Business In Marathi

पेपर कप व्यवसाय कसा सुरू करावा | Paper Cup Manufacturing Business In Marathi

3
Top 15 business iodeas foe housewives

TOP 15 गृहिणींसाठी व्यवसाय कल्पना | Business Ideas For Housewife In Marathi [2023]

3
Small business ideas in Pune

Small business ideas in Pune | पुण्यात सुरू करता येणारे व्यवसाय

1
patil kaki

या मराठमोळ्या स्टार्टअपला Shark Tank मधून मिळाली 40 लाखांची फंडिंग (Patil Kaki)

1

The Future of Mobile Gaming in Casinos

July 8, 2025

Indvirkningen af ​​kunstig intelligens på kasinodrift

July 8, 2025

Mother your children are like birds

July 7, 2025
ही गृहिणी 100 स्क्वेअर फुटांच्या खोलीतून वर्षाला करते 24 लाखांचा व्यवसाय !

ही गृहिणी 100 स्क्वेअर फुटांच्या खोलीतून वर्षाला करते 24 लाखांचा व्यवसाय !

July 3, 2025

Recent News

The Future of Mobile Gaming in Casinos

July 8, 2025

Indvirkningen af ​​kunstig intelligens på kasinodrift

July 8, 2025

Mother your children are like birds

July 7, 2025
ही गृहिणी 100 स्क्वेअर फुटांच्या खोलीतून वर्षाला करते 24 लाखांचा व्यवसाय !

ही गृहिणी 100 स्क्वेअर फुटांच्या खोलीतून वर्षाला करते 24 लाखांचा व्यवसाय !

July 3, 2025
tarun udyojak logo white

तरुण उद्योजक हे एक डिजिटल प्रकाशन असून आम्ही सोशल मिडियाच्या माध्यामातून मराठी भाषेत ब्रॅंड स्टोरीज, उद्योजकांच्या यशोगाथा तसेच बिझनेस आणि मार्केटिंग बद्दल माहिती प्रकाशित करतो.

आम्हाला सोशल साइट्सवर फॉलो करा

Browse by Category

  • 2
  • News
  • Uncategorized
  • उद्योजक यशोगाथा
  • फायनान्स
  • फ्रेंचायझी
  • बिझनेस
  • बिझनेस आयडिया
  • शेती व्यवसाय
  • सरकारी योजना
  • स्टार्टअप

Recent News

The Future of Mobile Gaming in Casinos

July 8, 2025

Indvirkningen af ​​kunstig intelligens på kasinodrift

July 8, 2025
  • About Us – Tarun Udyojak
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact Us

© 2022 Tarun Udyojak

No Result
View All Result
  • Home
  • उद्योजक यशोगाथा
  • बिझनेस
    • बिझनेस न्यूज
  • सरकारी योजना
  • बिझनेस आयडिया
  • फ्रेंचायझी
  • फायनान्स
  • स्टार्टअप

© 2022 Tarun Udyojak

error: Content is protected !!

व्हॉट्सॲपवर अपडेट मिळवण्यासाठी इथे क्लिक करा