Shark Tank India – Patil Kaki : शार्क टॅंकच्या दुसऱ्या सीझनला सुरुवात झाली आहे. या पर्वामध्ये मुंबईतील गीता पाटील यांनी सुरू केलेल्या ‘Patil kaki’ या स्टार्टअपने पिच दिला. चार शार्क्सने या स्टार्टअपमध्ये इन्वेस्ट करण्यात रस दाखवला. शेवटी Lenskart चे पीयूष बंसल आणि Shaadi. com चे अनुपम मित्तल यांची ऑफर Patil kaki च्या टीमने स्वीकारली. या स्टार्टअपला शार्क टॅंक मधून 40 लाख रुपयांची फंडिंग मिळाली. या आर्टिकलमधून आपण Patil Kaki या स्टार्टअपबद्दल आणि त्यांना Shark Tank मधून मिळालेल्या फंडिंगबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
Patil Kaki नक्की काय आहे ? (What is Patil Kaki?)
Patil kaki हा एक मराठमोळ्या व्यावसायिका गीता पाटील यांनी सुरू केलेला ब्रॅंड आहे जो पुरणपोळी, चिवडा, चकली, मोदक यांसारखे अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ ऑनलाइन विकतो. तसेच आता ते डिंक लाडू, मेथी लाडू, प्रोटिन लाडू यांसारखे आरोग्यदायी पदार्थ सुद्धा विकतात. नुकतेच ते ‘Shark tank India’ च्या दुसऱ्या सीझनमध्ये फंडिंग मिळवण्यासाठी गेले होते.
Patil Kaki स्टार्टअपची सुरुवात कशी झाली ? (How did Patil Kaki started )
गीता पाटील यांना आधी पासूनच स्वयंपाक बनवण्याची आवड होती. त्या त्यांच्या आईकडून ही कला शिकल्या. मग 2016 मध्ये त्यांनी आपल्या घरातच व्यवसाय सुरू करून मारठमोळे पदार्थ बनवायला सुरुवात केली. उत्तम चविमुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. 2016 आधी त्या फक्त एक आवड म्हणून त्या हे करत होत्या. मात्र 2016 मध्ये त्यांच्या पतीची क्लर्कची नोकरी गेली. त्यावेळी त्यांनी याचा एक प्रॉपर व्यय असाय म्हणूण विचार करण्यास सुरुवात केली.
त्यांना पहिली ऑर्डर खार मधील एका फॅमिली मधून आली. 2020 मध्ये लॉकडाउन नंतर या त्याच्या व्यवसायाला खऱ्या अर्थाने गती मिळाली. 2020 मध्ये त्यांनी Branding आणि मार्केटिंगव वर लक्ष द्यायचं ठरवल. मग त्यांनी आपल्या व्यवसायाच नाव ‘पाटील काकी’ ठेवल आणि सोशल मिडियाचा वापर करायला सुरुवात केली.
या सगळ्या गोष्टी त्यांचा मुलगा विनीत आणि त्याचा मित्र दर्शील याने सांभाळला. ते दोघेही School Dropout आहेत. विनीत आणि दर्शील या दोघांनी मिळून आधी IT सर्विस कंपनी सुद्धा सुरू केली होती. आधी पाटील काकी व्यवसायाचा टर्नओवर 12 लाखांच्या आसपास होता. मग त्यांनी योग्य Branding आणि मार्केटिंग करून एकाच वर्षात टर्नओवर 1.4 कोटींपर्यंत नेला. यासाठी त्यांनी Santracruz येथे 1200 स्क्वेअर फुट जागा भाड्याने घेतली आणि तिथे वर्कशॉप सुरू केला. तिथे साधारण 25 स्त्रिया काम करत होत्या. प्रसिद्ध उद्योगपति आनंद महिंद्रा यांनी सुद्धा विडियो शेअर करून त्यांच्या कामाची दखल घेतली.
मोदक , चकली आणि पुरणपोळी हे त्यांचे सर्वात विकले जाणारे प्रॉडक्ट आहेत. तसेच बेसणचे लाडू आणि चिवडा या पदार्थांना सुद्धा खूप मागणी असते. आतापर्यंत त्यांचे 20 हजार पेक्षा जास्त कस्टमर्स झाले आहेत.
Patil Kaki in Shark Tank India ( शार्क टॅंक इंडियामध्ये पाटील काकी स्टार्टअप )
शार्क टॅंक इंडियाच्या दुसऱ्या पर्वाच्या चौथ्या भागात Patil Kaki हा स्टार्टअप Funding मिळवण्यासाठी आला होता. 16 कोटींच्या व्हॅल्यूएशननुसार त्यांनी 2.5% इक्विटिसाठी 40 लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार त्यांना Counter Offers सुद्धा मिळाल्या. विशेष म्हणजे त्यांना 4 शार्क्स कडून ऑफर्स मिळाल्या. त्यात सर्वात चांगली ऑफर पीयूष बंसल आणि अनुपम मित्तल यांनी दिली. त्यांनी 10 कोटींच्या व्हॅल्यूएशननुसार 4% इक्विटि साठी 40 लाखांची ऑफर दिली. जी ऑफर स्वीकारली गेली.
Patil Kaki स्टार्टअप बद्दल अजून माहिती
पाटील काकी स्टार्टअपच्या प्रॉडक्टची average selling price ₹650 रुपये आहे. त्यांचा Gross Margin 25% आहे. तसेच मार्केटिंगसाठी 30% खर्च येतो. त्यांचा जून महिन्यात प्रॉफिट 1.08 लाख रुपये होता. जुलै महिन्यात वाढून तो 2 लाखांवर गेला आणि ऑगस्ट महिन्यात त्यांनी तब्बल 6.5 लाख रुपये नफा कमावला.
हे सुद्धा वाचा : Ashay Bhave – प्लॅस्टिक बॅगपासून शूज बनवणारा मराठी उद्योजक (Thaely Shoes)
Comments 1