ओडिशाच्या झारसुगुडा जिल्ह्यात राहणाऱ्या सुजाता अग्रवाल या एका सामान्य गृहिणी आहेत. पण त्यांच्या कल्पकतेमुळे आणि चिकाटीमुळे त्यांनी एका छोट्याशा टेरेसवरून तब्बल २४ लाख रुपयांचं वार्षिक उत्पन्न मिळवून दाखवलं आहे – तेही केवळ केशर शेती, हर्बल मसाला आणि नैसर्गिक सीरम तयार करून.
ही गोष्ट सुरू झाली २०२२ मध्ये. दररोजच्या प्रार्थनेसाठी त्या केशर वापरत असताना त्यांच्या मनात एक विचार आला – “जेवढं महागडं आणि दुर्मिळ आहे ते केशर आपण स्वतः उगम करू शकतो का?”
या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी इंटरनेटचा आधार घेतला. विविध व्हिडिओ, लेख, आणि अभ्यास पाहिल्यानंतर त्यांनी स्वतः प्रयोग करून पाहण्याचा निर्णय घेतला – तोही घराच्या टेरेसवर!
१०० चौरस फूटाची प्रयोगशाळा
साधारण गृहिणी ते स्मार्ट उद्योजिका असा त्यांचा प्रवास फार वेगळा होता. सुजातांनी आपल्या टेरेसवरील १०० चौरस फूट जागेला पूर्णपणे बदलून टाकलं. चिलर, रॅक्स, मिस्ट सिस्टीम आणि स्पेशल लाइट्स लावून त्यांनी काश्मीरसारखे थंड आणि दमट हवामान तयार केलं – कारण केशरचं रोप अतिशय नाजूक असतं आणि त्याला विशिष्ट वातावरण लागते.
सुरुवातीला त्यांनी २.५ लाख रुपयांची गुंतवणूक करत काश्मीरहून २५० किलो केशरच्या कांद्या विकत घेतल्या. एरोपोनिक्स पद्धतीचा अवलंब करत झाडांना मातीशिवाय, केवळ ओलसर हवेत वाढवण्याचा प्रयोग केला.
१५ दिवसांत केशरची पानं उगवली, आणि सात आठवड्यांत सुंदर फुलं उमलली. एक हंगाम ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आणि दुसरा फेब्रुवारीत घेतला जातो. एका हंगामात सुजातांना साधारण ४५० ग्रॅम शुद्ध केशर मिळतं. म्हणजेच वर्षाला ९०० ग्रॅम.
सध्या बाजारात केशरचा दर प्रतिकिलो १० लाख रुपये आहे. त्यानुसार, केवळ केशर विक्रीतूनच त्यांना दरवर्षी सुमारे ९ लाख रुपये उत्पन्न मिळतं.

‘पट्टी केशर’पासून कहवा मसाला
केवळ केशरच नव्हे, तर त्याचे बायप्रॉडक्ट्सही त्यांनी वापरले. केशर फुलांतील पिवळे परागकण आणि पाकळ्यांपासून त्यांनी ‘कहवा टी मसाला’ तयार करायला सुरुवात केली.
हा मसाला प्रतिकिलो ₹२,५०० ला विकला जातो. सध्या त्या महिन्याला ५ किलो मसाला विकतात – म्हणजेच सुमारे ₹१३,००० चे उत्पन्न.
नैसर्गिक सौंदर्य उत्पादनांचा ब्रँड
त्याच पाकळ्यांपासून त्या केसांसाठी आणि त्वचेसाठी नैसर्गिक सीरम बनवतात. प्रत्येक ३० मि.ली. ची बाटली ₹४०० ला विकली जाते. सध्या त्या दरमहा सुमारे २७० बाटल्या विकतात – म्हणजेच ₹१.०८ लाख दरमहा केवळ सीरममधून.
एक संपूर्ण यंत्रणा – एका खोलीतून
टोटल गणित पाहिलं तर, केवळ १०० चौरस फूटांच्या खोलीतून त्या वर्षाला सुमारे ₹२४ लाख उत्पन्न मिळवतात.
या सगळ्या प्रवासात त्यांनी काहीच वाया जाऊ दिलं नाही. प्रत्येक गोष्ट वापरली – मूळ उत्पादन, बायप्रॉडक्ट्स, आणि शेवटच्या उरलेल्या पाकळ्यांपर्यंत.
तुम्हाला सुद्धा केसर शेतीबद्दल आधिक माहिती हवी असेल तर “आधुनिक शेतीतील 25 व्यवसाय ” ही ई-बुक डाउनलोड करा. यात तुम्हाला केसर शेती सोबतच मशरूम शेती, केळीच्या वेफर्सचा व्यवसाय, फ्रूट जाम व्यवसाय अशा 25 पेक्षा जास्त व्यवसायांबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.
ई – बुक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.