एवढा जास्त डिस्काउंट देऊनसुद्धा D-mart प्रॉफिट कसा कमावतो हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. 2002 मध्ये मुंबईतील पवई मधून राधाकिशन दमानी यांनी D-mart ची सुरुवात केली. आज देशभरात डी-मार्टचे 100 पेक्षा जास्त शहरांमध्ये 300 पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. आणि डी-मार्ट ही देशातील सर्वात जास्त नफा कमावणाऱ्या रिटेल चेन्स पैकी एक आहे.
डी-मार्टमध्ये जवळपास सगळ्या गोष्टींवर 6 ते 15% किंवा त्यापेक्षा जास्त डिस्काउंट मिळतो. आता एवढा डिस्काउंट देणं डी-मार्टला कसं काय परवडत ते आपण पाहूया :
No Middlemen:
डी मार्ट B2C अर्थात बिझनेस टू कन्झ्युमर मॉडेलवर काम करते. म्हणजे ती मॅन्युफॅक्चरर कडून माल घेऊन डायरेक्ट एन्ड युझरला विकते. म्हणजे मधले होलसेलर, डिस्ट्रिब्युटर गायब होतात आणि कोणताही मिडलमेन नसल्याने कोणालाही कमिशन द्याव लागत नाही. त्यामुळे डी मार्टला ग्राहकांना अजून कमी किमतीत माल विकण्यास मदत होते.
Self owned stores :
राधाकिशन दमानी यांनी डिमार्टच्या सुरुवातीच्या दिवसांमध्येच स्टोअर ओनरशीप मॉडेल ऍडॅप्ट करण्याचा निर्णय घेतला. जवळपास 80% स्टोअर्स हे त्यांच्या स्वतः च्या मालकीचे आहेत. त्यांनी खुप हळूहळू expansion केलं. यामुळे डी-मार्टला कर्ज घेण्याची जास्त गरज नाही पडली. आणि त्यांची फायनान्शिअल कंडिशन चांगली राहिली.
Advance Payment to vendors:
Fmcg बिझनेसमध्ये रिटेलर्स क्रेडीटवर माल घेतात आणि व्हेंडर्सना 3 आठवड्यात पेमेंट करतात. पण डिमार्ट त्यांच्या व्हेंडर्सना माल घेतल्यानंतरच्या एक आठवड्यातच पेमेंट देते. एकदाच मोठ्या प्रमाणात माल खरेदी केल्याने आणि वेळेवर पेमेंट दिल्याने त्यांना ऍडिशनल डिस्काउंट मिळतो.
Simple Store Design :
तुम्ही जर कधी डी मार्ट मध्ये गेला असाल तर तुम्ही स्टोअरची डिझाइन बघितली असेल. कुठेही आकर्षक सजावट नसते. इंटेरिअर्स साधे असतात. त्यामुळे त्यांची ऑपरेशनल कॉस्ट कमी होते. तसेच डी मार्ट मध्ये बिलिंग काउंटर्स गरजेपेक्षा कमी असतात. त्यामुळे एम्प्लॉयी कॉस्ट सुध्दा कमी होते.
डी मार्टने जुलै ते सप्टेंबर 2022 या तिमाहीत तब्बल 10,638.3 कोटी रुपयांचा महसूल जमा केला.
Slotting Fee from Manufacturers :
याशिवाय डी मार्ट काही मॅन्युफॅक्चरर्स कडून स्लॉटिंग फी आकारते. ही एक फी असते जी डी-मार्ट मुख्यतः नवीन मॅन्युफॅक्चरर्स कडून त्यांचे प्रॉडकट्स डी-मार्टच्या शेल्स वर स्टोअर करण्यासाठी घेते. याला काहीवेळा एन्ट्री फी सुध्दा म्हणतात. ते प्रॉडकट्स डी मार्ट त्यांच्या एक्स्ट्रा ऑर्डीनरी मार्केटिंग आणि डिस्काउंट टेक्निक्स वापरून विकते.
Less spend on marketing :
ईतर ब्रँड्स प्रमाणे तुम्हाला D-mart ची जास्त जाहिरात दिसणार नाही. ते मार्केटिंग वर खूप कमी खर्च करतात. त्यांच्या जाहिराती या न्यूजपेपर मध्ये जास्त पाहावयास मिळतात. Marketing वर कमी खर्च करून सुध्दा D-mart ला Word-of-mouth मार्केटिंग चा जास्त फायदा होतो.
अशा काही कारणांमुळे D-mart ला इतका जास्त डिस्काउंट देणं परवडत.
तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.