Wow Momos Success Story – Wow Momo ही प्रसिद्ध भारतीय फूड चेन आहे जिची सुरुवात 2008 मध्ये पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता शहरात झाली. कंपनीचे फाऊंडर Sagar Daryani आणि Binod Kumar Homagai यांनी 6 बाय 6 च्या गाळयातून wow Momo ची सुरुवात केली. आज संपूर्ण भारतात त्यांच्या 480 हून आधिक Franchise आहेत. आणि या कंपनीच Valuation 1200 कोटींपेक्षा जास्त आहे. मागच्या काही वर्षात ही कंपनी खूप वेगाने वाढली आहे. या लेखातून आपण Wow Momo बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
Wow Momo ची सुरुवात
Sagar Daryani आणि Binod Kumar Homagai या मित्रांनी 2008 मध्ये कोलकाता मध्ये या व्यवसायाची सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी Spencer रीटेलमधील 6 बी 6 च्या Kiosk मधून स्टीम मोमोज विकायला सुरुवात केली. मग त्यांनी Wow Momo ही फास्ट फूड कंपनी एका गॅरेज मधून सुरू केली. त्यांचा पाहिला स्टोअर 200 स्क्वेअर फुट चा होता. फक्त एक टेबल आणि दोन शेफ यांच्यापासून त्यांनी सुरुवात केली. Spencer च्या दुकानात खरेदी करायला येणाऱ्या सगळ्या ग्राहकांना ते मोमोज ट्राय करायला सांगायचे. तसेच सुरुवातीपासूनच ते त्यांच्या ब्रॅंडचे टी – शर्ट घालायचे. याचा त्यांना मार्केटिंग साठी खूप फायदा झाला.
व्यवसायचं Expansion ( Wow Momos Success Story )
2010 मध्ये त्यांनी कोलकाता शहरात आपला पहिलं स्वतंत्र आउटलेट सुरू केला. यासाठी त्यांनी साधारण 14 लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर त्यांनी मुंबई, दिल्ली, कानपूर, बंगलोर, नोयडा, लखनौ या शहरांत आपले आउटलेट सुरू केले. आता 21 पेक्षा जास्त शहरांमध्ये कंपनीचे जवळपास 480 आउटलेट आहेत.
Wow Momo Funding
Wow Momo ला Tiger Global सारख्या जगभरातील मोठ्या Investors कडून Funding मिळाली आहे. आतापर्यंत कंपनीने 560 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची Funding मिळवली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये या कंपनीने Oaks Asset Management या Fund कडून जवळपास 125 कोटींची Funding मिळवली. त्यावेळी कंपनीच Valuation 2125 कोटी रुपये होत. मिळवलेल्या Funding चा वापर कंपनी Tier 1 आणि Tier 2 शहरांमध्ये आपला व्यवसाय वाढवण्यासाठी करणार आहे.
Wow Momo Business Model
Wow Momo च बिझनेस मॉडेल अगदी सिंपल आहे. मार्केटमध्ये बरेच छोटे व्यावसायिक 40 रुपयांपासून 90 रुपयांना मोमोज विकायचे. त्यांनी किमतीवर जास्त लक्ष न देता क्वालिटीवर दिल. ते COCO ( Company Owned Company Operated ) बिझनेस मॉडेलवर काम करतात. Raw Material खरेदी करण्यापासून ते प्रोसेसिंग, मएकीनग आणि डिलीव्हरी ही सगळी कामे कंपनी करते.
त्यांची सगळी प्रोसेस ही नीट तयार केली आहे. प्रत्येक कामगाराला त्याची कामे आधीच ठरवून दिलेली असतात.
Wow Momo ची खास वैशिष्ट्ये
Wow Momo च्या मोठ्या प्रमाणात Expansion होण्यामागे त्यांची काही युनिक वैशिष्टे आहेत. त्यांच्याआधी मोमोज अशाप्रकारे Branding करून कोणीही विकत नव्हते. त्यामुळे त्यांना First Mover Advantage मिळाला. त्यांची अनेक वैशिष्ट्ये आहेत त्यातून सर्वात महत्वाची दोन वैशिष्ट्ये म्हणजे :
मोमोजची व्हरायटी
Wow Momo 12 पेक्षा जास्त फ्लेवर्सचे मोमोज वैकते. त्यातसुद्धा 3 प्रकार असतात. Steamed, Fried आणि Pan-Fried. तिथे तुम्हाला व्हेज आणि नोन- व्हेज असे दोन्ही ऑप्शन मिळतील. तसेच ते मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचे मसाले ट्राय करतात. ज्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या चवीचा आनंद घेता येईल. तसेच ते चॉकलेट मोमोज सुद्धा सर्व करतात.
हे सुद्धा वाचा : या मराठमोळ्या स्टार्टअपला Shark Tank मधून मिळाली 40 लाखांची फंडिंग (Patil Kaki)
प्रेझेंटेशन
आधी मोमोज हे रोडच्या कडेला किंवा सध्या गाडीवर विकले जायचे. पण Wow Momo ने एक नवीन संकल्पना बाजारात आणली. आणि ती यशस्वीरीत्या सादर केली. त्यांचे शॉप हे बऱ्यापैकी मोठे असतात. तसेच मॉल, फुडकोर्ट अशा ठिकाणी सुद्धा त्यांचे आउटलेट आहेत. आता लोकांना Hygenic खायला आवडत. मग त्यासाठी ते जास्तीचे पैसे द्यायला तयार असतात. याच गोष्टीचा त्यांना फायदा झाला.
आता त्यांनी Wow Chinese हा ब्रॅंड बाजारात आणला आहे. चायनीज पदार्थांचा भारतीय व्हर्जन अशी काहीशी संकल्पना या नव्या ब्रॅंडची आहे. याचबरोबर ते ऑनलाइन फूड डिलीव्हरी करण्यासाठी येत्या काळात जास्त क्लाऊड किचन सुद्धा सुरू करण्याचा विचार करत आहेत.
Website : https://www.wowmomo.com/
कंपनीचे फाऊंडर Sagar Daryani एका मुलाखती दरम्यान सांगितल की त्यांना Wow MOmo ला एक जागतिक फूड ब्रॅंड बनवायचा आहे. Pizza Hut, KFC आणि डॉमिनोज यांसारखा जागतिक बाजारात त्यांना आपला ब्रॅंड मोठ्या उंचीवर न्यायचा आहे. आणि ते मेन्यू सुधरवण्यावर भर देत आहेत. जर तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तसेच असेच लेख आणि बिझनेस आयडियाज तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी साठी आपल्या WhatsApp ग्रुपला जॉइन व्हा.
हे सुद्धा वाचा : अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करावा | Agarbatti making business | मशीनची किंमत, साहित्य, कच्चा माल