India Post Franchise : जर तुम्ही कमी इन्वेस्टमेंट मध्ये Franchise शोधत असाल तर तुमच्या साठी भन्नाट आयडिया आणली आहे. पोस्ट ऑफिसच्या franchise स्कीमसाठी तुम्ही अप्लाय करून फक्त 5000 रुपयांच्या इन्वेस्टमेंट मध्ये Post Office ची फ्रेंचायझी मिळवू शकता. Post Office Franchise साठी कस Apply करायच, यासाठी काय प्रोसेस आहे, Profit किती आहे, याबद्दल आपण या लेखातून मराठीत माहिती घेणार आहोत.
पोस्टातील Saving Schemes या सेफ आणि चांगल्या रिटर्न देणाऱ्या म्हणून ओळखल्या जातात. अनेक योजना पोस्टाद्वारे चालवल्या जात. आपल्या देशात 1.55 लाखांपेक्षा जास्त पोस्ट ऑफिस आहेत. पण यातील 89% पोस्ट ऑफिस ग्रामीण भागात आहेत. आणि वाढत्या लोकसंख्येनुसार त्याची मागणी वाढत आहे.
आणि म्हणूनच या मागणीचा विचार करून भारतीय पोस्ट विभागाने Franchise ऑफर आणली आहे. ही Franchise घेऊन तुम्ही चांगली कमाई करू शकता. 18 वर्षांवरील कोणताही व्यक्ती त्यांच्या शहरात किंवा गावात पोस्टाची Franchise सुरू करू शकतो.
India Post Office Franchise Models
पोस्ट ऑफिसच्या Franchise साठी मुख्यतः 2 मॉडेल्स आहेत :
Franchise Outlets
असे एरिया जिथे पोस्टाच्या सेवांची गरज आहे पण त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस सुरू करू शकत नाही. अशा ठिकाणी Franchise Outlets च्या माध्यमातून काऊंटर सर्विसेस पुरवल्या जाऊ शकतात.
Postal Agents
शहरी आणि ग्रामीण भागात पोस्टल Agents स्टेशनरी आणि स्टॅम्प विकतात.
Franchise Outlet च्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवा आणि उत्पादने
- स्टॅम्प आणि स्टेशनरी विक्री
- रजिस्टर्ड आर्टिकल, स्पीड पोस्ट आर्टिकल आणि मनी ऑर्डर बूकिंग
- पोस्टल लाईफ इन्शुरन्स अर्थात PLI साठी डायरेक्ट एजेंट म्हणून काम
- ई- गवर्नेंस आणि नागरिक सुविधा सुगम बनवण्यात मदत इत्यादी कामे.
- भविष्यात जर पोस्टाने Outlets च्या माध्यमातून नवीन सेवा प्रदान करण्याचा निर्णय घेतला, तर तुम्ही ई सेवा सुद्धा प्रदान करू शकता.
पोस्ट ऑफिस Franchise कोण घेऊ शकत? ( Eligibility Criteria for Post Office Franchise )
- कोणताही भारतीय नागरिक या Franchise Outlet साठी अर्ज करू शकतो.
- ग्रामीण तसेच शहरी भाग आणि अर्बन टाउनशिपमधील कोणतीही संस्था तसेच कॉर्नर शॉप, पानवाला, किराणावाला, स्टेशनरी दुकानवाले हे India Post Franchise Outlet घेण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराच किमान वय 18 वर्ष असाव.
- अर्जदार किमान 8 वी पास असावा.
- ज्यांच्या घरातील कोणी पोस्टात आधीच कामाला असेल अशा लोकांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.
Post Office Franchise Cost
India Post Franchise घेण्यासाठी तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही. यासाठी तुम्हाला फक्त 5000 रुपये Security Deposit जमा करांव लागेल. तुम्ही पात्रतेत बसल्यावर आणि सर्व निकष पूर्ण होऊन तुमची निवड झाल्यावर तुम्हाला हे डिपॉजिट जमा करांव लागेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.
Post Office Franchise कमिशन
Sr. No . | सेवा (Service) | कमिशन (Commission) |
1 | रजिस्टर्ड आर्टिकलची बूकिंग | 3 रुपये प्रति बूकिंग |
2 | स्पीड पोस्ट बूकिंग | 5 रुपये प्रति बूकिंग |
3 | महिन्याला 1000 पेक्षा जास्त रजिस्ट्री आणि स्पीड पोस्टची बूकिंग केल्यावर | 20% अतिरिक्त कमिशन |
4 | 100 रुपये मूल्य ते 200 रुपयांपर्यंत मनी ऑर्डर बूकिंग, 200 रुपयांपेक्षा जास्त मूल्य असलेली मानी ऑर्डर बूकिंग | 3.5 रुपये, 5 रुपये |
5 | रिटेल सर्विस | 40% |
6 | पोस्ट स्टेशनरी, पोस्ट तिकीट आणि मनी ऑर्डर फॉर्म | विक्री मूल्याच्या 5% |
पोस्ट ऑफिस फ्रेंचायझीसाठी लागणारी कागदपत्रे ( Documents needed for India Post Franchise)
Post Office Franchise घेण्यासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागेल तसेच काही डॉक्युमेंट्स सुद्धा सादर करावे लागतील. त्याबद्दल माहिती खालीलप्रमाणे :
- पॅनकार्ड
- वयाचा पुरावा
- पासपोर्ट साइज फोटो
- पत्त्याचा पुरावा
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- पीपीओ प्रत (जर पोस्टाचे पेन्शनर असाल)
पोस्ट ऑफिस Franchise साठी अर्ज कसा करावा ? – Post Office Franchise Online Apply
जर तुम्हाला पोस्ट ऑफिस Franchise घ्यायची असेल तर आधी तुम्हाला पोस्टाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन फॉर्म डाउनलोड करावा लागेल. आम्ही तुम्हाला त्या फॉर्मची दौरेक्ट लिंक देणार आहोत. पोस्टाच्या Franchise साठी अप्लाय करण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया :
- सर्वात आधी तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन तुम्ही फॉर्म डाउनलोड करू शकता. तुम्हाला पोस्टल डिविजनल ऑफिस मध्ये सुद्धा Franchise Outlet Agreement फॉर्म मिळेल.
- पोस्टाच्या Franchise Outlet फॉर्मसाठी या लिंकवर डायरेक्ट क्लिक करा.
- हा फॉर्म प्रिंट करा आणि त्यातील माहिती नीट वाचा.
- मग हा फॉर्म नीट भरा आणि आवश्यक कागदपत्र सोबत जोडा.
- हा फॉर्म पोस्टल डिविजनल ऑफिसच्या पोस्ट विभागाच्या सुपरिन्टेन्डेन्टकडे जमा करा.
ही प्रक्रिया पूर्ण झाली की तुमच्या अर्जाची छाननी करून निकष पूर्ण झाले तर तुम्हाला फ्रेंचाइस सोपवली जेल. जर तुमची निवड झाली तर तुम्हाला Security Deposit म्हणून 5000 रुपये जमा करावे लागतील. जर तुम्हाला Franchise मिळाली तर पोस्टाकडून तुम्हाला प्रशिक्षण सुद्धा दिल जाईल.
हा ब्लॉग तुम्हाला महत्त्वाचा वाटला तर फेसबुक, व्हॉटसप्प वर नक्की शेअर करा. तसेच तुमची प्रतिक्रिया कमेंट करून कळवा.
आमचे इतर ब्लॉग्स वाचा :
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना 2023 | Pradhan Mantri Mudra Loan Scheme In Marathi
एक लाखात सुरू करता येणारे व्यवसाय | Businesses we can Start under 1 Lakh Rs.